मंत्री दादा भुसे आणि खासदार राजन विचारे बनले व्याही

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालेल्या विवाहसोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ आदींसहमान्यवरांनी हजेरी लावली.
State Agriculture Minister Dada Bhuse- Mp Rajan Vichare News Nashik
State Agriculture Minister Dada Bhuse- Mp Rajan Vichare News Nashik

मालेगाव : राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार व ठाणे येथील खासदार राजन विचारे यांची कन्या लतिशा यांचा विवाह आज सकाळी मनमाड चौफुलीवरील आनंद फार्म येथे अत्यंत साध्या पध्दतीने अवघ्या पंचवीस ते तीस जणांच्या उपस्थितीत पार पडला.

वधू-वरास शुभाशिर्वाद देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिंदे खासगी हेलीकाॅप्टरने येथील पोलिस परेड मैदानावर आले. तेथून कारने विवाहस्थळी रवाना झाले. भुसे व विचारे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. वधु-वरांना शुभेच्छा दिल्यानंतर ते लगेच रवाना झाले.

विवाह सोहळ्यानिमित्त आनंद फार्ममध्ये केलेला कृषीप्रधान देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालेल्या विवाहसोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ आदींसह राज्यातील विविध विभागांचे मंत्री, विधीमंडळ सदस्य तसेच उत्तर महाराष्ट्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली. सामान्य नागरिक, शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील यावेळी नवदांमपत्याला शुभेच्छा दिल्या.

कोरोना संसर्ग प्रतिबंधक नियमांचे पालन करीत साध्या पद्धतीने झालेल्या या आदर्श विवाह सोहळ्याचे अनेकांनी कौतुक केले. दादा भुसे यांनी यापुर्वी आपले जेष्ठ चिरंजीव अजिंक्य यांचा विवाह सामुदायिक विवाहसोहळ्यात केला होता. अविष्कारचा साखरपुडा समारंभ ठाणे येथे पार पडला होता.

सामुदायिक सोहळ्यात होणार होते लग्न..

पहिल्या लाटेनंतर कोरोना आटोक्यात आला. यामुळे तालुका शिवसेनेतर्फे २६ एप्रिलला सामुदायिक विवाहसोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यातच अविष्कारचा विवाह करण्याचे नियोजन होते. मात्र कोरोना संसर्गामुळे सामुदायिक विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला.

यानंतर भुसे यांनी अविष्कारचा विवाह कुठलाही बडेजाव न करता साध्या पध्दतीने पार पाडला. मंत्री असतानाही भुसे व परिवार कुठलाही बडेजाव करत नाहीत. सामान्यांशी त्यांची बांधिलकी कायम आहे, हे त्यांनी कतीतून दाखवून दिले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com