पंतप्रधानांची भेट घेतली म्हणजे शिवसेना नरमली असे कुणी समजू नये.. 

काँग्रेस केंद्रात सत्ता आणणार असेल तर त्यांचे स्वागत आहे. त्यांचा पंतप्रधान व्हायला पाहिजे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
Shivsena Mla Pradip jaiswal News Jalgaon
Shivsena Mla Pradip jaiswal News Jalgaon

जळगाव  : शिवसेना नरमली म्हणजे काय? दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली म्हणजे शिवसेना नरमली असे कुणी समजू नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना दिला. (Meeting the Prime Minister means that no one should think that Shiv Sena has softened.) शिवसेनेला एकीकडे वाघ म्हणता, तर दुसरीकडे नरमली म्हणता हा काय प्रकार आहे? असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा येथील कार्यकर्ता मेळाव्यानंतर त्यांनी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. (Shivsena Leader Mp Sanjay Raut) पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर शिवसेना नरमली या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.

राऊत म्हणाले, मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले ते राज्याच्या प्रश्नासाठी. राज्याच्या विकासाला गती मिळावी, केंद्राच्या अखत्यारीत जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटू शकतो. (PM Narednra Modi) राज्यातील मराठा आरक्षण, मुंबई मेट्रो कार, पीकविमा या संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने ही भेट घेतली, यात गैर नाही. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली म्हणजे शिवसेना नरमेल असा समज कुणी करून घेऊ नये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि वाघाची मैत्री सुरुवातीपासूनच होती. ही मैत्री काही सोपी नसते. वाघ हा वाघच असतो, पिंजऱ्यातला असो की जंगलातला असो. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे. शरद पवार हे या सरकारचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांनी जे सुतोवाच  केले ती राज्यातील जनतेच्या मनातली भावना आहे. ते योग्य तेच बोलले असे सांगत राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणात शिवसेनेबद्दल शरद पवार यांनी केलेल्या उल्लेखाचे राऊत यांनी समर्थन केले.

आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका काॅंग्रेस स्वबळावर लढणार या काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानकडे पत्रकारांनी राऊत यांचे लक्ष वेधले. ही चांगली गोष्ट आहे, काँग्रेस केंद्रात सत्ता आणणार असेल तर त्यांचे स्वागत आहे. त्यांचा पंतप्रधान व्हायला पाहिजे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.

यादीचे राज्यपालांना विचारा..

कुणी कितीही मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले तरी या सरकारने दीड वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे, उरलेल्या साडेतीन वर्षाचा कालावधी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पूर्ण करतील आणि ते ही महाविकास आघाडीचे सरकार असेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढली.  महाविकास आघाडी महासागर आहे, यात अनेकांना यावेसे वाटते.

माजी आमदार एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तेसुद्धा महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यांची ताकद आघाडीला निश्चितच मिळेल. त्यातून शिवसेना समर्थक पक्ष बळकट होणार असेल तर ती सुद्धा चांगले आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबद्दल विचारले असता या यादीत तुमच्या जळगाव जिल्ह्यातील नेत्याचे नाव आहे. राज्यपाल यांना एखाद्या कार्यक्रमास बोलावून हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com