आमदार निलंबनाच्या निषेधार्थ गिरीश महाजन यांच्या पत्नी रस्त्यावर; जामनेरमध्ये मोर्चा - Girish Mahajan's wife on the street to protest MLA suspension .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

आमदार निलंबनाच्या निषेधार्थ गिरीश महाजन यांच्या पत्नी रस्त्यावर; जामनेरमध्ये मोर्चा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जुलै 2021

निलंबित आमदारांमध्ये समावेश असलेल्या गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात तर त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनीच निषेध मोर्चाचे नेतृत्व करत आंदोलन केले. 

जळगाव ः  विधीमंडळात भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांच्या  निलंबनाच्या निषेधार्थ आमदार गिरीश महाजन यांच्या पत्नी पदर खोचून रस्त्यावर उतरल्या. (Girish Mahajan's wife on the street to protest MLA suspension)  त्यांच्या नेतृत्वाखाली जामनेरात भाजपचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

दोन दिवसीय विधानसभेच्या अधिवेशनात काल अभूतपुवर्व गाेंधळ झाला. तालिका  अध्यक्ष भास्कर जाधव यांचा माईक ओढणे, वेलमध्ये जाऊन गोंधळ घालणे आणि त्यानंतर उपाध्यक्षांच्या दालनात जाऊन जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. (Bjp Mla Girish Mahajans Wife Sadhna is lead Protest) त्यानंतर भाजपच्या गोंधळी बारा आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव विधीमंडळात पारित झाला.

या निर्णयाच्या विरोधात आक्रमक होत भाजपने आज राज्यभरात एक हजार ठिकाणी या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले. निलंबित आमदारांमध्ये समावेश असलेल्या गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात तर त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनीच निषेध मोर्चाचे नेतृत्व करत आंदोलन केले. 

राज्य विधिमंडळात बेकायदा वर्तन केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले. यांत जामनेर येथील आमदार गिरीश महाजन यांचाही सामावेश आहे. या आमदारांचे निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी तसेच ही चुकीची कारवाई करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी जामनेर येथे आज भाजप तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी तालुक्यतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करा, अशीही मागणी करण्यात आली.

आमदारांचे चुकीच्या पद्धतीने निलंबन करण्यात आले आहे, ते त्वरित रद्द करण्यात यावे. जर निर्णय रद्द केला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी साधना महाजन यांनी दिला.

हे ही वाचा ः भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेलाही दणका, थेट प्रक्षेपण केले बंद..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख