..तर मग रोहित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करा : भाजपची मागणी

कोणत्याही प्रकारचा काळाबाजार झालेला नसून रुग्णांचे प्राण वाचण्याचे काम माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केल्याचा भाजपचा दावा.
rohit pawar ff
rohit pawar ff

नंदुरबार : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या विरुद्ध रेमडेसिव्हिरचा साठा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावरून आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष भडकला आहे. मलिक यांनी चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची भाषा करत असतील तर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष  विजय चौधरी यांनी केली आहे.

राज्यात रेमडेसिव्हिरच्या साठेबाजीवरून सत्ताधारी राष्ट्रवादी काॅंग्रेस व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलीक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर आरोप केला होता. नंदुरबार मधील हिरा पॅलेस येथे सदर इंजेक्शन विकण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

या वादावर आजा नंदुरबारचे भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी भाष्य करत रोहित पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली.
 

प्राण वाचवणे गुन्हा आहे?

रेमडिसिवर इंजेक्शन बाबत कोणत्याही प्रकारचा काळाबाजार झालेला नसून रुग्णांचे प्राण वाचण्याचे काम माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे. अत्यंत कमी किंमतीत हे इंजेक्शन रुग्णांपर्यंत पोहचवले आहेत. रुग्णांचे प्राण वाचवणे गुन्हा असेल तर अवश्य गुन्हा दाखल करा. परंतु माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जसे इंजेक्शन वाटले त्याचप्रमाणे आमदार रोहित पवार यांनी देखील त्यांच्या मतदारसंघात इंजेक्‍शन वाटप केले आहे. नवाब मलिक साहेब तुम्ही शिरीष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करत असाल तर आमदार रोहित पवार यांच्यावरही तुम्हाला गुन्हा दाखल करावाच लागेल, याचा पुनरुच्चार देखील विजय चौधरी यांनी केला. 

राजेंद्र शिंगणे काय म्हणाले?

अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी रात्री एक व्हीडिओ ट्विट करत आपली रेमडिसिविरच्या वादावर भूमिका मांडली. भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा जो अपप्रचार करत आहे त्यानिमित्ताने हा खुलासा देत आहे. भाजप रेमडीसीविर विकत घेऊन मला देणार होते, अशी उलटसुलट चर्चा समाज माध्यम व सोसिएल मीडियावर सुरू असून ते सपशेल चुकीचे आहे. कुठल्याही पक्षाला रेमडीसीविर वैयक्तिक रित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही ते त्यांना सरकारलाच द्यावे लागेल, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले. तुम्ही आमच्या सप्लायरकडून रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करावीत, असे त्यांनी मला सांगितले. आता ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभाग रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. शिंगणे यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com