कोरोना संसर्गच्या धोक्यामुळे साताऱ्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द - Royal Simollanghan ceremony in Satara canceled due to threat of corona infection | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना संसर्गच्या धोक्यामुळे साताऱ्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

यंदाच्या कोरोनाच्या भीषण परिस्थित संसर्गाचा धोका पत्करणे योग्य वाटत नसल्याने उद्या (रविवार) होणारा विजयादशमीचा शाही सिमोल्लंघन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजघराण्यावर प्रेम, निष्ठा असणा-या हितचिंतक, कार्यकर्ते, नागरीक यांनी याची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

सातारा : जागतिक स्तरावर कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिवर्षीप्रमाणे उद्या (रविवारी) होणारा साताऱ्यातील राजघराण्याचा विजयादशमीचा शाही सिमोल्लंघन सोहळा यावेळेस रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

शिवप्रभु छत्रपतींच्या राजगादीची विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाची पूर्वापार चालत आलेली परंपरा तितक्याच तोलामोलाने आम्ही पुढे चालु ठेवली आहे, असे सांगून उदयनराजे म्हणाले, हा शाही सिमोल्लंघन सोहळा सातारकर आणि सर्वसामान्य जनतेचा मोठा उत्सव ठरला आहे. यावेळी विधीवत श्री भवानी तलवारीचे पूजन जलमंदिर पॅलेस येथे झाल्यावर या ऐतिहासिक तलवारीची जलमंदिर ते पोवईनाका अशी पालखीतुन मिरवणुक काढण्यात येऊन, पोवईनाका येथे सिमोल्लंघनाचे विधीवत पूजन करण्यात येते.

पूजन झाल्यावर परत ही पालखी जलमंदिर पॅलेस येथे आल्यावर पूजा-अर्चा झाल्यावर राजघराण्यातील सर्व सन्माननीय सदस्य हे समस्त सातारकरांच्या आपटयाच्या पानांचा स्विकार करतात. त्यानंतर समस्त सातारकर नागरीक सोने लुटतात, अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा सोहळा मोठया उत्साहात आणि प्रथा-परंपरेप्रमाणे साजरा केला जातो.

हा एक जनतेचा उत्सव असतो. तथापि यंदाच्या कोरोनाच्या भीषण परिस्थित संसर्गाचा धोका पत्करणे योग्य वाटत नसल्याने उद्या (रविवार) होणारा विजयादशमीचा शाही सिमोल्लंघन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजघराण्यावर प्रेम, निष्ठा असणा-या हितचिंतक, कार्यकर्ते, नागरीक यांनी याची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख