‘त्या’ अधिकाऱ्यांचा भाजपचा गमचा घालून सत्कार

मनपातील बांधकाम विभाग व नगररचना विभागातील अधिकारी बुधवारी भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये गेल्याचा अजब प्रकार घडला होता. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महापालिकेत स्थायी समितीची सभा संपल्यानंतर सभागृहाच्या प्रवेशद्वारावर या अधिकाऱ्यांना भाजपचा गमचा घालून सत्कार केला.
NCP Corporators protested against officer who attended BJP Meeting
NCP Corporators protested against officer who attended BJP Meeting

जळगाव  : मनपातील बांधकाम विभाग व नगररचना विभागातील अधिकारी बुधवारी भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये गेल्याचा अजब प्रकार घडला होता. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महापालिकेत स्थायी समितीची सभा संपल्यानंतर सभागृहाच्या प्रवेशद्वारावर या अधिकाऱ्यांना भाजपचा गमचा घालून सत्कार केला.

जळगाव मनपात भाजपची एकहाती सत्ता असून गुरुवारी स्थायी समितीची सभा असल्याने बुधवारी भाजपने वसंतस्मृती कार्यालयात पार्टी मीटिंग घेतली. या बैठकीस भाजपचे आमदारांसह पदाधिकारी, महापौर, स्थायी सभापती, नगरसेवक, स्थायी सदस्य उपस्थित होते. परंतु, काही मनपा अधिकाऱ्यांनीही बैठकीस शहर अभियंता, नगररचना विभागाचे अभियंताही उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर विरोधी पक्षाने टिकेची झोड उठवली.

राष्ट्रवादीकडून अनोखा निषेध
राष्ट्रवादीचे महानराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी भाजपच्या मीटिंगला उपस्थित राहिलेल्या या अधिकाऱ्यांना गुरुवारी स्थायी समितीची सभा झाल्यानंतर मनपा प्रवेशद्वाराजवळ गाठले. आणि भाजपचा गमचा त्यांच्या गळ्यात घालत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या प्रकारामुळे या अधिकाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.

सत्ता असली म्हणून भाजपने मनमानी करु नये. अधिकाऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी बोलावले असले तरी अधिकारी कोणत्या अधिकारात तेथे गेले? हा प्रकार बेकायदेशीर असून त्याच्या निषेधासाठीच आपण हे अनोखे आंदोलन केले - अभिषेक पाटील

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com