आमचे बॅनर का काढले, असे म्हणत युवक कॉंग्रेसचा महापालिकेवर हल्लाबोल…

सरकारनामा ब्यूरोनागपूर :कॉंग्रेसच्या नेत्यांचे शहरात लागलेले बॅनर महानगरपालिकेने काढून टाकले. याविरोधात युवक कॉंग्रेसने थेट महानगरपालिका गाठून आयुक्त राधाकृष्णन बी. यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मज्जाव केल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.
आमचे बॅनर का काढले, असे म्हणत युवक कॉंग्रेसचा महापालिकेवर हल्लाबोल…
Sarkarnama Banner (

नागपूर : कॉंग्रेसच्या नेत्यांचे Congress Leaders शहरात लागलेले बॅनर महानगरपालिकेने काढून टाकले. याविरोधात युवक कॉंग्रेसने Youth Congress थेट महानगरपालिका गाठून आयुक्त राधाकृष्णन बी. Municipal Commissioner Radhakrishnan B. यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मज्जाव केल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. 

महानगरपालिकेला भारतीय जनता पक्षाचे लागलेले बॅनर चालतात, मग कॉंग्रेसचे बॅनर का नाही चालत, असे युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आमचे शहरात लागलेले बॅनर काढत असाल, तर मग भाजपचेही काढले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सध्या नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे त्यांची मनमानी सुरू आहे. पण आयुक्तांनी महापालिकेत असलेल्या सर्व पक्षांसोबत समान न्याय केला पाहिजे. 

सत्ताधाऱ्यांच्या चुकाही खपवून घेणे आणि विरोधक असतील तर योग्य कामांनाही विरोध करणे, असे अजिबात चालणार नाही, असे म्हणत आज युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. बॅनर्स आणि पोस्टर्स हातांमध्ये घेत त्यांनी महानगरपालिका गाठली. पण विरोध करण्यासाठी आयुक्तांच्या कक्षापर्यंत पोहोचण्याच्या आधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले. त्यामुळे तेथे काही काळ चांगलाच गोंधळ उडाला. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना लक्ष्य करणे, हे काही नवीन नाही. पण आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांचे फालतुचे लाड पुरवू नये, असे युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय थेटे म्हणाले. 

नागपुरात सध्या भाजप आणि कॉंग्रेसमध्ये बॅनर वॉर सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी भाजप आणि कॉंग्रेसचे बॅनर्स लागलेले आहेत. यातच कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरीश पांडव यांच्या वाढदिवसाचे बॅनर महानगरपालिकेने काढले. त्याविरोधात युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत रोष व्यक्त केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या कक्षातही शिरण्याचा प्रयत्न केला. महापालिका आयुक्त हे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसने केला आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in