काल आमदार जोरगेवार संतापले, अन् आज आमदारांना लॅपटॉप मिळाले...

काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला होता. याची दखल सभागृहाने घेतली आणि आजपासून गॅलरीत बसणा-या सर्व आमदारांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Kishor Jorgewar
Kishor Jorgewar

नागपूर : कोरोनामुळे अधिवेशनात सोशल डिस्टंसिंग पाळले जावे, यासाठी काही आमदारांना गॅलरीत बसविण्यात आले आहे. मात्र या आमदारांना लॅपटॉप दिले नसल्याने सभागृहातील कामकाज पाहण्यास अडचण येत होती. यावर काल चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आज येथील सर्व आमदारांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले.

मध्यंतरी कमी झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्याने सभागृहात कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळले जात आहेत. अधिवेशनादरम्यान सामूहिक अंतर पाळले जावे, याकरिता एका बेंचवर एका आमदारालाच बसविण्यात येत आहे. तर उर्वरित आमदारांसाठी सभागृहातील गॅलरी येथील बेंचेस आरक्षित करण्यात आले आहेत. मात्र गॅलरीत बसणा-या आमदारांकडे लॅपटॉप न दिले गेल्याने सभागृहातील कामकाज पाहणे व ते समजणे अवघड झाले होते. त्यामुळे काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला होता. याची दखल सभागृहाने घेतली आणि आजपासून गॅलरीत बसणा-या सर्व आमदारांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

चंद्रपुरकरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्या...
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारतर्फे सादर केलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला समर्थन देताना चंद्रपुरातील विविध समस्यांना न्याय देण्याची मागणी आमदार जोरगेवारांनी सभागृहात केली. पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे साहेब यांना चंद्रपुरातील पर्यटन स्थळांना भेट देऊन यावर्षीच्या बजेटमध्ये वाढीव निधी देण्याची मागणी केली. चंद्रपुरातील जनता प्रदूषणयुक्त वातावरणात राहून राज्याला वीज देण्यासाठी मोठा त्याग करीत आहे. त्यामुळे शासनाने २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची मागणी पुन्हा एकदा सभागृहात केली. 

चंद्रपुरात कोळसा खाणी, पेपर मिल, वीजनिर्मिती केंद्र, सिमेंट कारखाने यांसारखे मोठे उद्योग आहेत. या उद्योगांचाही पर्यटनाच्या दृष्टीने विचार करून औद्योगिक पर्यटन सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जावे. चंद्रपूर शहराला ऐतिहासिक असे परकोट आहे. त्यामुळे ऐतिहासिक पर्यटनासाठीही हा जिल्हा योग्य असून येथे विविध प्रकारचे पर्यटन सुरू करता येऊ शकतात, याकडे आमदार जोरगेवार यांनी  सभागृहाचे लक्ष वेधले. रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको -प्रो संस्थेचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी पर्यावरण मंत्र्यांचे आभार मानले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचा-यांना ८ महिन्यांपासून वेतन मिळत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. चंद्रपूरातील अमृत कलश योजना अजूनही पूर्ण झालेली नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच नव्याने निर्मित झालेल्या घुग्घुस नगर परिषदेला या अर्थसंकल्पात भरघोस निधी मिळावा, अशी मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com