यवतमाळ तालुक्यात भाजपची सरशी, तर इतरत्र महाविकास आघाडीचा बोलबाला  - in yavatmal taluka bjp is on lead and on other talukas mahavikas alliance is in swing | Politics Marathi News - Sarkarnama

यवतमाळ तालुक्यात भाजपची सरशी, तर इतरत्र महाविकास आघाडीचा बोलबाला 

चेतन देशमुख 
सोमवार, 18 जानेवारी 2021

दारव्हा-नेर-दिग्रस तालुक्यात शिवसेनेला सर्वाधिक कौल मिळत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पहायला मिळाली. आघाडीचा झेंडा बहुतांश ग्रामपंचायतीवर फडकण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींमधील आठ हजार 101 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार 110 ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले आहेत. यवतमाळ तालुक्यातील बहुतांश भागात भाजपची सरशी दिसून येत आहे. इतर ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबाला दिसत आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील गावांत पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी नऊ वाजतापासून तालुकास्तरावर सुरू झाली आहे.  16 तालुक्यात 15 टेबलांवर मतमोजणी सुरू आहे. संबंधित तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार फेरींची संख्या निश्‍चित करण्यात आलेली आहे. साधारणतः 15 फेऱ्या प्रत्येक तालुक्यात होणार आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. यात त्या भागांतील गटानुसार सर्वच पक्षांना संमिश्र कौल मतदारांनी दिला आहे. यवतमाळ तालुक्यात निवडून येणाऱ्यांमध्ये भाजपच्या सदस्यांची संख्या जास्त आहे. दारव्हा-नेर-दिग्रस तालुक्यात शिवसेनेला सर्वाधिक कौल मिळत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पहायला मिळाली. आघाडीचा झेंडा बहुतांश ग्रामपंचायतीवर फडकण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आठ हजार जागांसाठी तब्बल 17 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींच्या संख्या
यवतमाळ-67
बाभूळगाव-55
आर्णी-66
नेर-50
दारव्हा-76
दिग्रस-48
पुसद-105
महागाव-73
उमरखेड-85
घाटंजी-50
केळापूर-45
झरी जामणी-41
वणी-82
मारेगाव-31
कळंब-59
राळेगाव-47
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख