यवतमाळ जिल्ह्यात तीनच आमदारांनी दिला कोरोना निधी, बाकीच्यांचे हात आखडतेच...  - in yavatmal district only three mlas gave corona funds rest not contributed | Politics Marathi News - Sarkarnama

यवतमाळ जिल्ह्यात तीनच आमदारांनी दिला कोरोना निधी, बाकीच्यांचे हात आखडतेच... 

चेतन देशमुख 
शुक्रवार, 7 मे 2021

जिल्ह्यात आमदारांची संख्या मोठी आहे. त्यातील वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक व राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी एक कोटी निधीचे पत्र दिले आहे. उर्वरित अनेक आमदारांचे पत्र अद्यापही पोहोचलेले नाही.

यवतमाळ : कोरोनाच्या या संकटकाळात ज्याला जशी जमेल तशी व्यवस्था उभारली जात आहे. पण जिल्ह्यातील काही आमदारांचे मात्र अद्यापही मदतीचे हात पुढे आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल विविध चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने आमदारांना एक कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी (Additional funds of crores of rupees) कोरोनाच्या लढ्यासाठी दिला आहे. त्यांनी या अवघड काळात तो वापरावा आणि लोकांना दिलासा द्यावा, अशी माफक अपेक्षा आहे. पण जिल्ह्यातील बव्हंशी आमदारांनी कोरोनासाठी निधी दिला नाही, हे वास्तव आहे. केवळ तीनच आमदारांनी या निधीसाठी पत्र दिले. (Only three MLAs submitted letters for the fund पण उर्वरित आमदारांना अद्याप तरी वेळ मिळालेला नाहीये. 

कोरोनामुळे मृतांची संख्या वाढतच आहे. बेड, ऑक्‍सिजनसोबत इंजेक्‍शन, औषधांसाठी (Beds, injections with oxygen, for medicines) रुग्णांसोबत नातेवाइकांची फरफट सुरू आहे. अशा स्थितीत इतर भागातील लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेतला आहे. कुणी कोविड रुग्णालय सुरू केले, तर कुणी इंजेक्शन, औषधी उपलब्ध करून देत आहेत. याबाबतीत जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचे योगदान दिसत नाही. (People's representatives are not contributied) आमदार निधीतील एक कोटी रुपयांपर्यंत निधी देऊ शकतात. जिल्ह्यातील तीनच आमदारांनी तसे पत्र दिले असून, अजूनही अनेकांना पत्र देण्यासाठी वेळ मिळालेला नाही. 

जिल्ह्यात विधानसभेचे सात, विधान परिषदेचे तीन आमदार आहेत. त्यात आमदार मदन येरावार, संजय राठोड, प्रा. डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक, डॉ. संदीप धुर्वे हे विधानसभेचे आमदार आहेत. दुष्यंत चतुर्वेदी, ॲड. नीलय नाईक, डॉ. वजाहत मिर्झा हे विधान परिषदेचे आमदार आहेत. सत्ताधारी असो किंवा विरोधक राज्यपातळीवरील नेत्यांसोबत आमदारांची अत्यंत जवळीक आहे. त्यामुळेच सत्ता कुण्याही पक्षाची असो, जिल्ह्याला कायम मंत्रिपद मिळाले आहे. (The district has got a permanent ministerial post) असे असतानाही जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. या काळात अनेक लोकप्रतिनिधी गायब आहेत. 

जिल्ह्यात आमदारांची संख्या मोठी आहे. त्यातील वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक व राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी एक कोटी निधीचे पत्र दिले आहे. उर्वरित अनेक आमदारांचे पत्र अद्यापही पोहोचलेले नाही. त्यामुळे अशा संकट काळात आमदारनिधीसाठी आखडता हात घेतल्याचे दिसत आहे. प्रत्येक आमदारांनी निधी दिल्यास काही प्रमाणात का होईना, रुग्णांना सुविधा मिळणार आहे. 

हेही वाचा : परमबीरसिंग यांच्या नजिकचे पोलिस निरीक्षक कोथमिरेंची गडचिरोलीला बदली...

ऑक्‍सिजन मशीनची मदत 
आमदार संजय राठोड, मदन येरावार यांनी रुग्णांसाठी ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटेड दिल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर रुग्णालयांत ही मशीन आमदारांनी दिली आहे. जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. अशा स्थितीत लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन नागरिकांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

या तीन आमदारांनी दिले पत्र 
१. संजीवरेड्डी बोदकुरवार (Sanjeevreddi Bodkurwar) ः एक कोटी 
२. इंद्रनील नाईक (Indrnil Naik) ः एक कोटी 
३. प्रा. डॉ. अशोक उईके (Dr. Ashok Uike) ः एक कोटी 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख