अजित पवारांच्या निर्देशानंतर 'धारीवाल'वर कारवाई होण्याची कामगारांना आशा

धारीवाल कंपनीच्या इतर विषयांवर उच्चस्तरीय बैठक लावण्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगीतले. एकंदरीतच आता धारीवाल कंपनीच्या मनमानीला चोप बसणार आहे.
ajit_pawar
ajit_pawar

चंद्रपूर : येथील धारीवाल कंपनीत कामगारांवर होणा-या अन्यायाविरोधात आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने आवाज उचलला आहे. आता धारीवाल कंपनीला कामगार विरोधी धोरण चांगलेच भोवणार आहे. जोरगेवार यांच्या मागणीनंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा धारीवाल कंपनीच्या अधिका-यांची बैठक घेतली. मुंबईत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती होती. अजित पवार यांनी धारीवाल कंपनीतील कामगार विरोधी धोरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. कामगार मंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. 

या बैठकीला मुंबईहून उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांची उपस्थिती होती. तसेच आमदार जोरगेवार, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, अप्पर कामगार आयुक्त विजय पानबूडे, प्रदुषण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी एम. करे, संकेत हस्ते, सहाय्यक कामगार आयुक्त यु. एस. लोया, जयंत मोहकर, वि.डी. शूक्‍ला आणि धारीवाल कंपनीकडून गौतम गोशाल, प्रवीण शंकर, संदिप मूखर्जी उपस्थिती होते. विधानसभा निवडणुकीपूर्वीही आमदार जोरगेवार यांनी धारीवाल कंपनीवर मोर्चा काढत कंपनीविरोधात बिगुल फुंकले होते. आमदार झाल्यानंतर त्यांनी धारीवाल कंपनीतील कामगारांवरील अन्यायाविरोधात सातत्याने पाठपूरावा केला. 

कंपनी सूरु करतांना कंपनीने किमान एक हजार लोकांना कायमस्वरुपी रोजगार देण्याचे कबुल केले होते. मात्र अद्यापही कंपनीने स्थानिकांना कायमस्वरुपी रोजगार दिलेला नाही. धारीवाल कंपनीने अधिग्रहीत केलेल्या जमीनीचा योग्य मोबदला दिला नाही. कंपनी सुरू करण्यापुर्वी येथील गावांचा विकास करण्याचे आश्वासन कंपनीच्यावतीने देण्यात आले होते. मात्र अद्यापही गावांचा विकास झालेला नाही. येथील कामगारांना योग्य वागणूक दिली जात नाही. कंपनीची पाण्याची पाईपलाईन शेतातून जात असल्यास सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई आणि रोजगार दिलेला नाही. भूमिहीन व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सुद्धा रोजगार दिलेला नाही. यांसह अनेक मुद्दे यावेळी आमदार जोरगेवर यांनी अजित पवार यांच्यापूढे उपस्थित केले. या सर्व मुद्यांवर पवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला विचारणा केली. 

कंपनी व्यवस्थापणाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक कामगार आयूक्तांनीही सदर कंपनी कामगार विरोधी धोरण राबवत असल्याचे सांगीतले. या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असता कंपनी व्यवस्थापन समाधानकारक उत्तर देत नसल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर ना. अजित पवार यांनी या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच सदर कंपनीच्या इतर विषयांवर उच्चस्तरीय बैठक लावण्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगीतले. एकंदरीतच आता धारीवाल कंपनीच्या मनमानीला चोप बसणार आहे. यावेळी बाळकृष्ण जुवार, माजी नगरसेवक बलराम डोडानी, अजय जयस्वाल, ऍड. राम मेंढे, रुपेश झाडे, विजय सोनटक्के, विरेंद्र गुरफूडे आदिंची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com