१७ लाख कोटी रुपयांची कामे केली, पण भ्रष्टाचाराची एकही तक्रार नाही...

सिस्टममध्ये काम करणारे सर्वच जण चोर आणि बेईमान आहेत, असे समजूनच सिस्टम बनविण्यात आली आहे, असे वाटते.कारण आएएस आणि तत्सम अधिकाऱ्यांना जे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये सकारात्मकता असत नाही, असे वाटते. तीअसली पाहिजे. निर्णय प्रक्रिया गतिमान असली पाहिजे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : मागील सरकारच्या काळात १७ लाख कोटी रुपयांची कामे केली. या सरकारमध्येही ४ लाख कोटींच्या कामांचे आदेश झालेले आहेत. ही कामे करताना जर मी कुणाकडून पैसे घेतले, तर ते लपू शकणार नाही. त्यामुळे आजपर्यंत मी केलेल्या एकाही कामात भ्रष्टाचाराची एकही तक्रार झाली नाही. पण आज आपली संपूर्ण सिस्टमच भ्रष्टाचाराने बरबटली आहे आणि हे सांगताना मी कुणालाही घाबरत नाही. कारण मी लॉजिकल कामे करतो, पारदर्शकतेने करतो, भ्रष्टाचारमुक्त, वेळेच्या आत करतो आणि रिझल्ट देतो. मोदींच्या सरकारमध्ये मी हे बेधडकपणे बोलू शकतो, याचा मला अभिमान आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

एनएचएआयच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला दोन वर्षाऐवजी १३ वर्ष लागले. १२० कोटी रुपयांऐवजी ३५० कोटी रुपये लागले. त्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात नितीन गडकरींनी या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची जाहीरपणे लाज काढली होती. या मुद्यावरून ‘तुम्ही देशभर लाखो कोटी रुपयांची मोठमोठी कामे करता. सरकारी यंत्रणेतूनच ही कामे केली जातात. तेव्हा एखाद्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होईल किंवा तक्रार होईल, याची भिती तुम्हाला वाटत नाही का’, असा प्रश्‍न गडकरींना विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी उपरोक्त उत्तर दिले. 

‘ते’ भाषण मी एनएचएआयच्या इमारतीसाठी केलं होतं
एनएचएआयची इमारत जी दोन वर्षांत तयार व्हायला पाहिजे होती, तिला १३ वर्ष लागले. त्यामुळे १२० कोटी रुपये खर्चून बनायला पाहिजे होती त्याला ३५० ते ३७५ कोटी रुपये लागले. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय मोठ्या प्रमाणात झाला. त्याची चीड माझ्या मनात होती. त्यामुळे मी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना खडसावण्यासाठी ते भाषण केले होते. पण एनएचएआयमध्ये असे अधिकारी आहेत, तर चांगले पण अधिकारी आहे, असे गडकरी म्हणाले. 

त्या इमारतीच्या कामात दिरंगाई, चुका करणे, वेळेवर निर्णय न घेणे, असे प्रकार झाले. पण एनएचएआयमध्ये चांगले पण काम होते. आजच आम्ही ३५ किलोमीटर प्रतिदिवस प्रमाणे रस्त्याचे काम पूर्ण केले. ४० कोटीचे रस्ते आम्ही आज देशात बांधत आहोत. जगात रस्त्यांची येवढी कामे कोणत्याही देशात होत नाही. हा एक विश्‍वविक्रम आहे. नुकताच आम्ही अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता २४ तासात पूर्ण केला. २५ किलोमीटरचा एक रस्ताही आम्ही २४ तासात पूर्ण केला. हासुद्धा विश्‍वविक्रम आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट दोन्ही लोक आहेत. माझा तो प्रहार देशाच्या हितासाठी आणि वाईट प्रवृत्तीवर होता. 

रस्त्याची लांबी मोजण्याची पद्धत जी युपीए सरकारमध्ये होती, तीच आताही आहे. तीन लेनचा १ किलोमीटरचा रस्ता असेल, तर त्याची मोजणी तीन किलोमीटर होते. रस्ते मोजणीची ही आंतरराष्ट्रीय पद्धत आहे. सरकारमध्ये मंत्री कशा प्रकारचा आहे, हे बघून अधिकारी प्रतिसाद देतात आणि काम करतात आणि अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला आहे. कारण माझ्यासोबत काम करणाऱ्या या लोकांना मी माझा परिवार मानतो. त्यामुळे पुढील सर्व अडचणी दूर होतात. मी महाराष्ट्र सरकारमध्ये काम केले, केंद्र सरकारमध्ये काम केले आणि आजही निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांशी माझे पारिवारीक संबंध आहेत. माणसांना कधीच ‘यूज ॲन्ड थ्रो’ मी नाही केले. त्यामुळे मी ज्यांच्यासोबत काम केले त्या लोकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केले. 

सगळेच चोर आणि बेईमान आहेत…
सिस्टममध्ये काम करणारे सर्वच जण चोर आणि बेईमान आहेत, असे समजूनच सिस्टम बनविण्यात आली आहे. कारण आएएस आणि तत्सम अधिकाऱ्यांना जे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये सकारात्मकता असली पाहिजे. निर्णय प्रक्रिया गतिमान असली पाहिजे. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या निश्‍चित तारखेला वेतन मिळते. मग हे लोकांची कामे कशी काय चार-चार महिने अडकवून ठेवू शकतात. त्यांना तो अधिकार नाही, हे प्रशिक्षणात शिकवले पाहिजे, अशी सूचनाही गडकरी यांनी केली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com