केवळ नोकरी म्हणून नाही नैतिक जबाबदारी समजून काम करा : खासदार बाळू धानोरकर 

उपविभागात 5600 ट्रान्सफार्मर बसवण्यात आले आहेत. मात्र यातील एखाद्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्यास दुसरे ट्रान्सफार्मर बसविण्याकरिता वीज वितरण कंपनीकडे ते उपलब्ध नसल्याचेही यावेळी उघड झाले. खासदारांनी विचारलेल्या प्रश्नची योग्य उत्तरे वीज वितरण कॅंपणीचे अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Balu Dhanorkar at Wani
Balu Dhanorkar at Wani

वणी (जि. यवतमाळ) : शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास देऊन नका, कृषी पंपाना तत्काळ वीज पुरवठा करा, ग्राहकांच्या वीज बिलासंदर्भात येणाऱ्या तक्रारींचे निवारण केवळ नोकरी म्हणून नाही तर आपली नैतिक जबाबदारी समजून कामे करा, असे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले. 

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना विजेचे बिल देण्यात आले नव्हते. तीन महिन्याचे बिल एकाच वेळी आल्याने नागरिकांचा महिन्याचा बजेट कोलमडला. त्यातच विद्युत देयके जादा आल्याची ओरड सर्वत्र सुरू झाली. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी आज येथील विश्रामगृहात उपविभागातिल वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता मंगेश वैद्य, उप कार्यकारी अभियंता विनोद मानकर, विलास चेले, रवींद्र खोंडे, राहुल पावडे, सहाय्यक अभियंता एम. ए. शेख उपस्थित होते. 

खासदार धानोरकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अनेक मुद्यांना हात घातला. कृषी वीज जोडणी बाबत विचारणा केली असता, गेल्या दोन वर्षांपासून नवीन वीज जोडणी करण्यात आली नसल्याचे वास्तव समोर आले. शेतकऱ्यांना सोलर वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र सोलरपासून निर्मित होणाऱ्या विजेने कृषी पंप चालत नाही. शेतकऱ्यांची फसगत होत आहे. पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोलर बसविण्यास भाग पाडू नये, त्यांना वीज जोडणी करून द्या. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोलरकरिता अनामत रक्कम भरली असेल, ती त्यांना परत करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचे 48 तासांत निराकरण करणे गरजेचे असतांना त्यांना बरेच दिवस वाट पहावी लागते. याकडे लक्ष वेधून तात्काळ त्यांच्या तक्रारीं निकाली काढा, आशा सुचना केल्या. 

उपविभागात 5600 ट्रान्सफार्मर बसवण्यात आले आहेत. मात्र यातील एखाद्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्यास दुसरे ट्रान्सफार्मर बसविण्याकरिता वीज वितरण कंपनीकडे ते उपलब्ध नसल्याचेही यावेळी उघड झाले. खासदारांनी विचारलेल्या प्रश्नची योग्य उत्तरे वीज वितरण कॅंपणीचे अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आज दिलेल्या निर्देशांचे पालन केले की नाही, यासाठी लवकरच पुन्हा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगून केवळ नोकरी म्हणून नाही तर आपली नैतिक जबाबदारी समजून काम करा, असे ठणकावून सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com