महिला म्हणतात लिकर लॉबी जिंकली गं..., महाविकास आघाडीने उठवली दारूबंदी...

दारूबंदी उठवा या मागणीसाठी सुमारे पाच लाख निवेदने आली होती. तर बंदी कायम ठेवा या मागणीसाठी ३३ हजार निवेदने आली होती, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी यापूर्वी दिली होती. अवैध दारू वाहतुकीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी आजवर सुमारे ३ हजार महिला, तर ४०० बालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Liquor Ban
Liquor Ban

मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महिला संघटना आणि ग्रामपंचायतींच्या ठरावाची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेला दारूबंदीचा निर्णय आज महाविकास आघाडी सरकारने मागे घेतला. The decision to ban alcohol was withdrawn by the Mahavikas Aghadi government today बंदीचा निर्णय केवळ कागदावर ठेवत दारूमाफीयांनी अवैध वाहतूक सुरू केली The liquor mafia started illegal traffic असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार Guardian Minister Vijay Wadettiwar यांनी स्पष्ट केले. 

अशी अवैध वाहतूक करणाऱ्या टोळ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढीला लागली होती. त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याने हा निर्णय फिरवण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. दारूबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होते आहे काय, हे पाहण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. 

महसुलाची काळजी 
दरम्यान चंद्रपुरातील दारूबंदीमुळे दर महिन्याला सुमारे २०० कोटींचे नुकसान होत असल्याचा प्रारंभिक अंदाज व्यक्त केला जात होता. अर्थमंत्रालयात झालेल्या बैठकीत कोरोनाकाळात महसूल कमी झाला असताना या निर्णयाचा फेरविचार करायला हवा, असे मत व्यक्त केले जात होते. रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी निर्णयाचे पुनरावलोकन करण्यासाठी १३ सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. यात ६ सदस्य सामाजिक क्षेत्रात काम करणारे होते तर अन्य शासकीय अधिकारी होते.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदोपत्री असून समाजकंटक या संधीचा लाभ घेत जिल्ह्यातील वातावरण बिघडवताहेत का, याचा तपास करत होते. चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर आणि पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे दारूबंदीमुळे नुकसान होत असल्याचे मत होते. उत्पादन शुल्क खात्याचा महसूल बुडतो आहे काय, यावर खात्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही बैठक बोलावली होती. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला प्रारंभ होताच हा विषय मांडला गेला. अन् तो पारितही झाला. आता महाराष्ट्रातील वर्धा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांतच दारूबंदी असेल.

ही तर कबुली : मुनगंटीवार 
दरम्यान चंद्रपुरात दारूबंदीचा पाठपुरावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली. आईबहिणींना निराशेच्या गर्तेत टाकणाऱ्या या निर्णयामागे महाविकास आघाडी सरकारने आपण कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखू शकत नाही, याची कबुली दिल्याची टीका केली आहे.

दारूबंदी उठवा या मागणीसाठी सुमारे पाच लाख निवेदने आली होती. तर बंदी कायम ठेवा या मागणीसाठी ३३ हजार निवेदने आली होती, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी यापूर्वी दिली होती. अवैध दारू वाहतुकीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी आजवर सुमारे ३ हजार महिला, तर ४०० बालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com