विजयी उमेदवाराच्या तीन दिवसांच्या आनंदोत्सवावर असे पडले विरजण...

गेडाम व ईव्हीएमवर पहिल्यांदाच निकाल बघणाऱ्या त्यांच्या समर्थकांना क्रमांक बघण्यात चूक झाली. अन् आपल्यालाच 236 मते मिळाली, असा त्यांचा समज झाला. यातूनच त्यांनी आपलाच विजय झाल्याचे समजत जल्लोष केला.
Bhangaram Talodhi
Bhangaram Talodhi

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली. अन् विजयी झाल्याचे सांगत तो बाहेर आला. पॅनलच्या सर्व सदस्यांसोबत त्याने गावात जल्लोष केला, फटाकेही फोडले. विजयाच्या आंनदात आज गावातील नवनियुक्त उमेदवार प्रमाणपत्र घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गेले. यावेळी त्या प्रभागातून दुसराच उमेदवार विजयी असल्याचे त्यांना समजले. अन् त्यांना धक्का बसला. अशा अनपेक्षित निकालाने धक्का बसल्याने त्यांनी चैकशी केली. अन तो पराभूत असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे आधी पराभूत झालेल्या उमेदवाराला आपला विजय झाल्याची माहिती मिळाली. अन् त्याच्या आंनदाला पारावार उरला नाही. राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. तो प्रत्यय देणाऱ्या भंगाराम तळोधीतील या घटनेची तालुक्यात खमंग चर्चा आहे.

भंगाराम तळोधी ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रं. 4 ची निवडणूक झाली. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या प्रभागातून भाजपचे कमलेश गेडाम व कॉंग्रेसचे मनोज सिडाम हे उमेदवार आमनेसामने होते. निवडणुकीनंतर अठरा जानेवारी रोजी मतमोजणी झाली. मतमोजणीदरम्यान कमलेश गेडाम व समर्थकांनी आपला विजय झाल्याचे सांगत जल्लोष केला. गावातही फटाके फोडून आंनदही साजरा केला. आपला पराभव झाल्याचे समजून मनोज सिडाम हा हिरमुसल्या तोंडाने घरी गेला. दरम्यान आज भंगाराम तळोधी येथील काही नवनियुक्त विजयी उमेदवार प्रमाणपत्र घेण्याकरिता तहसील कार्यालयात गेले. आपले प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांनी इतर विजयी उमेदवारांच्या प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. त्यावेळी प्रभाग क्रं. 4 मधून मनोज सिडाम विजयी झाला असून कमलेश गेडाम यांचा पराभव झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. 

ही माहिती कळताच त्यांना धक्का बसला. लागलीच चैकशीला सुरवात झाली. तहसीलदार के.डी. मेश्राम यांनी त्यांना सविस्तर तपशील दाखवित निकाल बरोबर असल्याचे सांगीतले. इकडे पराभूत समजले गेलेल्या मनोज सिडाम यांना आपला विजय झाला असल्याचे समजताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय देणाऱ्या भंगाराम तळोधीतील या घटनेची तालुक्यातील राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.

नेमके झाले असे ...
ईव्हीएमवर क्रमांक 1 वर कमलेश गेडाम यांचे चिन्ह होते. तर क्रमांक दोनवर मनोज सिडाम होते. कमलेश गेडाम यांना 218 मत मिळाली तर मनोज सिडाम यांना 236 मते मिळाली. गेडाम व ईव्हीएमवर पहिल्यांदाच निकाल बघणाऱ्या त्यांच्या समर्थकांना क्रमांक बघण्यात चूक झाली. अन् आपल्यालाच 236 मते मिळाली, असा त्यांचा समज झाला. यातूनच त्यांनी आपलाच विजय झाल्याचे समजत जल्लोष केला. पहिल्यांदाच ईव्हीएमवर निकाल बघताना झालेल्या क्रमांकांच्या घोडचुकीने हा प्रकार घडला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com