वारा वेगाने वाहात होता, अन् विमान हेलकावे खात होते; श्‍वेताने सांगितला तो थरार...

श्वेता सांगत होती, एअर इंडियाचे एआय- २४४ हे विमान दिल्ली येथून काबूलला जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, ही फ्लाईट नेहमीसारखी नव्हती. कारण अवघ्या २४ तासांमध्ये काबूल तालिबान्यांच्या हाती पडले.
वारा वेगाने वाहात होता, अन् विमान हेलकावे खात होते; श्‍वेताने सांगितला तो थरार...
Sarkarnama Banner

नागपूर : तब्बल १ तास आम्ही १६ हजार फूट उंचीवर घिरट्या मारत होतो. काबूलमधील स्थिती माहीत असल्याने विमानात जास्तीचे इंधन भरले होते. पण बाहेर वाराही वेगाने वाहत होता अन् विमान हेलकावे खात होते. The wind was blowing fast the plain was swaying अखेर परवानगी मिळाली व दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी आमचे विमान खाली उतरले. विमानतळ नेमके कुणाच्या ताब्यात आहे याचा मुळीच अंदाज नव्हता. जिवाला धोका असल्याने कुणालाही विमानाच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. सर्वत्र, सायरन, गोळीबार, नागरिकांचे ओरडणे असा कोलाहल सुरू होता. अमेरिकन सी-१७ ग्लोबमास्टर आणि हेलिकॅाप्टर्स यांच्या आवाजाने जणू लढाईच पेटली असे वाटत होते, असा थरारक अनुभव श्‍वेता शंके या हवाई सुंदरीने सांगितला. Shweta said that thrill.

श्‍वेता म्हणाली, जवळजवळ चार तास आम्ही काबूल विमानतळावर होतो. आपल्याच देशातून जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्यासाठी सुरू असलेली अफगाणी नागरिकांची केविलवाणी धडपड पाहून तेथील भयंकर परिस्थितीची जाणीव आम्हाला होत होती. एकदाचे तीन तास ४८ मिनिटांनी आमच्या विमानाने उड्डाण केले. तरीही जीव थाऱ्यावर नव्हताच. अखेर रविवारी रात्री साडेआठ वाजता आमचे विमान दिल्लीत उतरले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना रविवारी एअर इंडियाच्या एआय- २४४ या विमानाने भारतात आणण्यात आले. या विमानात हवाईसुंदरी होती, मूळची दर्यापूरची (जि. अमरावती) श्वेता चंद्रकांत शंखे. सध्या दिल्लीत असलेल्या श्वेताशी संपर्क साधला असता तिने सांगितलेला काबूल विमानतळावर प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता. 

श्वेता सांगत होती, एअर इंडियाचे एआय- २४४ हे विमान दिल्ली येथून काबूलला जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, ही फ्लाईट नेहमीसारखी नव्हती. कारण अवघ्या २४ तासांमध्ये काबूल तालिबान्यांच्या हाती पडले. तेथे नेमके काय घडत आहे हे विमानातील क्रू मेम्बर्सनाही सांगितले गेले नव्हते. एरवी आम्हाला तेथे काय घडत आहे, याची माहिती होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी आम्ही ठेवली होती. कारण तुम्हाला सिद्ध होण्यासाठी असे प्रसंग वारंवार येत नाहीत. आम्ही सर्व तयारीनिशी तेथे गेलो होतो. प्रवाशांचे जेवणही सोबत घेतले होते. 

श्वेता पुढे म्हणाली, दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावरून रविवारी दुपारी १२.४५ ला लाहोरमार्गे काबूलकडे उड्डाण केले. १ वाजून ४५ मिनिटांनी आम्ही काबूलच्या आकाशात पोहोचलो. पण लॅंडिंगची परवानगी मिळत नव्हती. कारण विमानतळावर प्रचंड गोंधळ होता. तालिबानी काबूलमध्ये घुसल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलर कर्मचारी पळून गेले होते. आमचे विमान तालिबान्यांच्या नजरेत येऊ नये म्हणून म्हणून पायलटने रडार बंद केले. आमच्या मनातही धाकधूक सुरू होती. कारण तब्बल १ तास आम्ही १६ हजार फूट उंचीवर घिरट्या मारत होतो. परंतु, काबूलमधील स्थिती माहीत असल्याने विमानात जास्तीचे इंधन भरले होते. बाहेर वाराही वेगाने वाहत असल्याने विमान हेलकावे खात होते. 

अखेर परवानगी मिळाली व दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी आमचे विमान खाली उतरले. विमानतळ नेमके कुणाच्या ताब्यात आहे याचा मुळीच अंदाज नव्हता. जिवाला धोका असल्याने कुणालाही विमानाच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. सर्वत्र, सायरन, गोळीबार, नागरिकांचे ओरडणे असा कोलाहल सुरू होता. अमेरिकन सी-१७ ग्लोबमास्टर आणि हेलिकॅाप्टर्स यांच्या आवाजाने जणू लढाईच पेटली असे वाटत होते. सर्वत्र धुराचे साम्राज्य होते. विमानातील प्रवाशांना सुखरूप परत आणणे हेच आमचे एकमेव ध्येय होते. दिल्ली ते काबूल हे अंतर १.०५ ते १.२० मिनिटांचे आहे. ६ वाजून २० मिनिटांनी काबूल सोडले. रात्री साडेआठ वाजता विमान दिल्ली विमानतळावर लॅंड झाले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

आपल्या जिवाची बाजी लावत अफगाणिस्तानमधून भारतीयांना आपल्या देशात सुखरूप आणणाऱ्या एअर लाइन्सच्या विमानातील हवाईसुंदरी श्वेता शंखे हिची कामगिरी ऐकून तिच्या मूळगावी दर्यापुरात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. श्वेता दर्यापूरमधील बाभळी येथे शिवाजी चौकात राहते. तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक  
आहेत. बहीण दर्यापूरमध्ये दंतरोगतज्ज्ञ आहे. भाऊ फार्मासिस्ट आहे. २०१७-१८ मध्ये तिची निवड हवाई सुंदरीकरिता झाली. प्राथमिक प्रशिक्षण संपल्यावर इंडियन एअरलाइन्समध्ये ती कार्यरत झाली. सध्या ती दिल्ली येथे तैनात आहे. श्वेताचे व तिच्या परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in