सदाभाऊ खोत भाजपला सोडून राजू शेट्टींसोबत हात मिळवणार ? - will sadabhau khot leave bjp and join Raju shetty | Politics Marathi News - Sarkarnama

सदाभाऊ खोत भाजपला सोडून राजू शेट्टींसोबत हात मिळवणार ?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

काही मुद्द्यांवर आम्ही वेगळे झालो. याचा अर्थ आमच्या विचारांमध्ये मतभिन्नता नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही दोघेही एकाच विचारधारेतील आहोत. गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे भाजपावर नाराज आहेत.

नागपूर : भाजपचा मित्रपक्ष असलेली सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढत आहे. त्यामुळे सदाभाऊ भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत ‘राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो’, असं सदाभाऊंनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. हा एक प्रकारचा संकेत असून ते आता भाजपला राम राम करून राजू शेट्टींसोबत हात मिळवणार असल्यांच्या चर्चांना उत आला आहे.  

“राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेले म्हणूनच राजू शेट्टी आणि माझ्यात दरी निर्माण झाली. जर शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास उतरले तर निश्चितपणे राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेन”, अस सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर लुटारूंच्या विरोधात आम्ही दोघेही लढलो. पण जर आज राजू शेट्टींनी लुटारुंची संगत सोडली तर त्यांना परत खांद्यावर घ्यायला मी तयार आहे, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. जी मागणी मी केली तीच मागणी राजू शेट्टी यांनीही उचलून धरली आहे. त्यांच्यात आणि माझ्यात काही शेताच्या बांधावरुन भांडण नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या, ऊसाच्या प्रश्नांवर माझे आणि राजू शेट्टींचे एकमत होत असेल, तर एकत्रितपणे साखर सम्राटांच्या विरोधात उभे राहू शकतो, अशी शक्यताही सदाभाऊंनी वर्तविली आहे. 

या मुलाखतीत सदाभाऊ म्हणतात, राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो. काही मुद्द्यांवर आम्ही वेगळे झालो. याचा अर्थ आमच्या विचारांमध्ये मतभिन्नता नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही दोघेही एकाच विचारधारेतील आहोत. गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे भाजपावर नाराज आहेत अशी चर्चा आहे. सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे. भाजपाचा मित्रपक्ष असलेली रयत क्रांती संघटना या निवडणुकीच्या निमित्ताने वेगळी चूल मांडताना दिसते आहे. अशात आता सदाभाऊ खोत यांनी राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो असं वक्तव्य करत राजू शेट्टी यांच्याशी हात मिळवण्याचे आणि भाजपाची साथ सोडण्याचे संकेत दिलेत आहेत. 

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख