पदवीधरांवर आत्महत्या करण्याची वेळ आणाल का ?

या मतदारसंघात निवडून येऊन अनेक लोक मोठे झाले. पण हा राजकीय मतदारसंघ नाही, ही बाबत ते विसरले आणि राजकीयीकरण केले. नेत्यांचा राष्‍ट्रीय पातळीवर नावलौकीक झाला, पण पदवीधरांच्या समस्या आजही ‘जैसे थे’ आहेत.
Vinod Raut.
Vinod Raut.

नागपूर : पदवीधरांचे कुठलेच प्रश्‍न सुटलेले नाहीत, हे गेल्या १८ वर्षांपासून अनुभवायला येत आहे. आजवरच्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली. आता काय पदवीधरांवरही आत्महत्या करण्याची वेळ आणणार का, असा सवाल पदवीधर मतदारसंघातून अपक्ष लढत असलेले प्रा. डॉ. विनोद राऊत यांनी केला आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. राऊत म्हणाले, पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांचा दौरा केला असता असे लक्षात आले की अनेक पदवीधरांनी असा कुठला मतदारसंघ असतो, हे सद्धा माहिती नाही. पदवीधर हा मतदारसंघ राजकीय लोकांसाठी नाहीच मुळात. तरीही राजकीय मंडळींनी यावर अतिक्रमण केले आहे. २८८ विधानसभा मतदारसंघ राजकीय लोकांसाठी आहेत. हा एक मतदारसंघ तर आमच्यासाठी सोडा. आम्ही पदवीधराच्या भविष्यातील उत्थानासाठी लढत आलो आहोत आणि अजूनही लढतो आहोत. आताही वेळ गेलेली नाही. राष्ट्रीय पक्षांनी आपआपले उमेदवार मागे घ्यावे आणि आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले आहे.

मी डमी उमेदवार असल्याचा अपप्रचार काही राजकीय मंडळींकडून केला जात आहे. पण मी भाजपचाही नाही आणि कॉंग्रेसचाही नाही, हे त्यांनी निक्षून सांगितले. १९ उमेदवारांमध्ये डॉ. राऊत एकमेव पीएचडी आहेत. १८ वर्षांपासून कमला नेहरू महाविद्यालयात मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करीत असताना पदवीधरांच्या समस्या जवळून बघितल्या आहेत. त्यांच्यासाठी आंदोलने केलेली आहेत. तरीही त्यांचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. डीग्री घेऊन आजही पदवीधर भटकंती करताना दिसतात आणि त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही, हे भयावह वास्तव असल्याचे ते म्हणाले. 

या मतदारसंघात निवडून येऊन अनेक लोक मोठे झाले. पण हा राजकीय मतदारसंघ नाही, ही बाबत ते विसरले आणि राजकीयीकरण केले. नेत्यांचा राष्‍ट्रीय पातळीवर नावलौकीक झाला, पण पदवीधरांच्या समस्या आजही ‘जैसे थे’ आहेत. कुणाचेही नाव न घेता तुम्ही मोठे झालात, पण पदवीधर होतो तेथेच आणि तसेच आहेत. या निवणुकीसाठी दोन लाख सहा हजार पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. अजूनही पदवीधर शिल्लक आहेत, की ज्यांनी नोंदणी केलीच नाही. याचे कारण म्हणजे त्यांना राजकीय अज्ञानात ठेवण्यात आले. आजवर ज्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले, त्यांच्या विरोधात आपली लढाई असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत संजय गोहणे, ईश्‍वर राऊत, योगेश राऊत, हेमंत डीके, टी. सी. राऊत आणि सलीम शेख उपस्थित होते.
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com