राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसापूर्वी होणार उपराजधानीच्या अध्यक्षाची निवड? शर्यतीत कुंटे पाटीलही... - will the election of city president held before founding day of ncp kunte patil in the race | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसापूर्वी होणार उपराजधानीच्या अध्यक्षाची निवड? शर्यतीत कुंटे पाटीलही...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

नगरसेवक दुनेश्वर पेठे आणि जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांची नावे अध्यक्षपदासाठी सर्वाधिक आघाडीवर आहेत. मात्र या दोन्ही नावांना अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. याच कारणाने तातडीने अध्यक्ष जाहीर करण्याचे राष्ट्रवादीने टाळले असल्याचे समजते.

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नागपूर शहराध्यक्ष निवडीच्या हालचालींनी वेग पकडला आहे. आतापर्यंत नगरसेवक दुनेश्‍वर पेठे Duneshwar Pethe आणि जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार Prashant Pawar यांच्या नावांची चर्चा होती. पण त्यात राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील Pravin Kunte Patil याचे नाव चर्चेत आले आहे. कुंटे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षश्रेष्ठींनी, प्रदेशाध्यक्षांनी आदेश दिल्यास कोणत्याही पदावर काम करण्यास तयार आहे. सोबतच विदर्भातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि अनिल देशमुख यांचाही निर्णय तेवढाच महत्वाचा असल्याचे त्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. The decision of Praful Patel and Anil Deshmukh is equally important

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस १० जूनला आहे. त्यापूर्वीच नागपूर शहराचा अध्यक्ष निवडला जाईल, अशा हालचाली दिसत आहेत. शहरातील काही पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे उद्या बुधवारी अध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अध्यक्षपदासाठी आघाडीवर असलेले दुनेश्‍वर पेठे आणि प्रशांत पवार यांच्या नावामध्ये आता कुंटे पाटील यांच्या नावाची भर पडली आहे. 

अनिल अहीरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून त्यांना बढती देऊन प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्ष करण्यात आले आहे. शहराच्या अध्यक्षाची निवड अद्याप व्हायची आहे. नगरसेवक दुनेश्वर पेठे आणि जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांची नावे अध्यक्षपदासाठी सर्वाधिक आघाडीवर आहेत. मात्र या दोन्ही नावांना अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. याच कारणाने तातडीने अध्यक्ष जाहीर करण्याचे राष्ट्रवादीने टाळले असल्याचे समजते. त्यामुळे माजी शहराध्यक्ष तसेच प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांचे नाव आता समोर आले आहे. मुंबईला तातडीने रवाना होणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे. ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटतम मानले जातात. त्यामुळे कुंटे यांचे नाव जाहीर झाल्यास आश्चर्य वाटणार नाही असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले. 

हेही वाचा : मोदी-ठाकरेंचं गुफ्तगू; राज्यात राजकीय चर्चांना उधाण

शहराध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले नेते आज मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या शहराध्यक्षाचा निर्णय होणार असल्याचीही माहिती आहे. पण दुनेश्‍वर पेठे, प्रशांत पवार की प्रवीण कुंटे पाटील यावर उद्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल, नागपूर शहराध्यक्षाची निवड ही विदर्भाच्या दृष्टीनेही महत्वाची आहे. त्यामुळे विदर्भातील राष्ट्रवादीचे दोन प्रमुख नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही मत या निर्णयात तेवढेच महत्वाचे राहणार आहे. त्यामुळे उद्या काय निर्णय होतो, याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. 
 Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख