मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याही मागे लागणार ईडी आणी सीबीआयचा ससेमिरा ?

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी हा सर्व खटाटोप केला. त्यामुळे आमदार रवी राणा यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याच विरोधात दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरेंनीविदेशात घर, हॉटेल्स यांसह अमाप संपत्ती आणि काळा पैसा त्यांनी जमविल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Uddhav Thackeray - Ravi Rana
Uddhav Thackeray - Ravi Rana

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे The Chief Minister Uddhav Thackeray आणि परिवहन मंत्री अनिल परब, Transport Minister Anil Parab जे स्वतः वकील आहेत. या लोकांनी घाणेरडे राजकारण करून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navnit Rana आणि मला टारगेट केले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी द्वेषाचे राजकारण केले आहे. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. विदेशात उद्धव ठाकरेंच्या अवैध मालमत्ता आणि काळा पैसा आहे आणि याचे पुरावे ईडी आणि सीबीआयला देणार असल्याचे सांगत बडनेराचे आमदार रवी राणा MLA Ravi Rana यांनी खळबळ उडवून दिली आहे.  

उद्धव ठाकरेंनी त्यांचा काळा पैसा विदेशात ठेवलेला आहे. अनेक देशांमध्ये त्यांची अमाप संपत्ती आहे आणि त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे सांगत आमदार राणा यांनी राज्याच्या राजकारणात नवे वादळ आणले आहे. त्यांच्या पत्नी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेले जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द ठरविले होते आणि त्यांना २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला खासदार राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन खासदार राणा यांना दिलासा दिला आहे. 

अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात जातीचे खोटे प्रमाणपत्र तयार करून निवडणूक लढविल्याचा खटला दखल केला होता. त्यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिल्याने पुढील निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये पहिली याचिका ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची होती. तर दुसरी याचिका ही लोकसभा निवडणुकी दरम्यान केलेल्या जात प्रमाणपत्राबाबतची होती. यामधील २०१७ च्या याचिकेवर निकाल देत खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले आहे. 

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी हा सर्व खटाटोप केला. त्यामुळे आमदार रवी राणा यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याच विरोधात दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरेंनी विदेशात घर, हॉटेल्स यांसह अमाप संपत्ती आणि काळा पैसा त्यांनी जमविल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात यावर काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागलेले आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com