माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर जिल्हाध्यक्षांवर का चिडले ?

महानगरपालिकेने कोरोना काळात केलेल्या कामावरही अहीर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कारण महापालिकेवर भाजपची सत्ता आहे आणि महापौर मुनगंटीवार गटाच्या आहेत. आपल्‍या विरोधी गटावर ताशेरे ओढण्याची एकही संधी अहीर सोडत नाहीत.
Hansaraj Ahir
Hansaraj Ahir

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारला विरोधी पक्षाच्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. The state government is facing criticism from the opposition काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात ‘आक्रोश’ मोर्चाचे आंदोलन राज्यभर करण्यात आले. The agitation of 'Akrosh' Morcha was carried out all over the state चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर Hansaraj Ahir आले आणि थेट जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यावर चिडले. 

अहीर यांनी जिल्हाध्यक्षांवर चिडचिड का केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलनस्थळी राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व पदाधिकारी हजर होते आणि हंसराज अहीर यायचे होते. पण ते येण्यापूर्वीच आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे आल्यावर त्यांनी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यावर निशाणा साधला. मी येईपर्यंत पाच दहा मीनीटेही तुम्ही थांबू शकत नाही का, असे म्हणत त्यांना चांगलेच सुनावले. काल आयोजित केलेला कार्यक्रम हा पक्षाचा होता. त्यामुळे अहीर यांना तेथे यावे लागले. नाहीतर मुनगंटीवार आणि अहीर यांच्यातले शीतयुद्ध जगजाहीरच आहे. 

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण काही महिन्यांपूर्वी अहीर यांना महानगरपालिकेत जाऊन पालिकेच्या कामावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून महापालिकेतही भाजपचे दोन गट आहेत, हे उघड झाले होते. भाजप हा शिस्तीसाठी जाणला जाणारा पक्ष आहे. पण या पक्षालाही गटबाजीचे ग्रहण लागल्याचे अशा घटनांवरून लक्षात येते. परवा परवा झालेल्या आमसभेतही ही बाब प्रकर्षाने लक्षात आली होती. मुनगंटीवार आणि अहीर यांच्यातील शीतयुद्ध जगापुढे आले ते २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर. त्यापूर्वी सलग तीन वेळा निवडून आलेल्या अहीर यांचा पराभव झाला होता. 

हंसराज अहीर यांनी वेळोवेळी आपल्या पराभवावर खंत बोलून दाखवलेली आहे. त्या निवडणुकीला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अहीर यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे झालेल्या पराभवाबाबत दुःख व्यक्त केले होते. गटबाजीमुळेच आपला पराभव झाला, याची सल त्यांना अजूनही जाणवते आहे. कारण यावेळी जर ते निवडून आले असते तर त्यांना केंद्रात चांगले पॉवरफुल्ल खाते मिळण्याची दाट शक्यता होती. 

महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या अमृत योजनेच्या शुभारंभप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर एकत्र आले होते. त्यावेळी नगरसेवकांनी अहीर यांच्या तुलनेत मुनगंटीवार यांचे स्वागत आणि सत्कार मोठ्या प्रमाणात केले होते. त्यावेळीही अहीर तेथून नाराजी व्यक्त करून निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी आपल्या गटातील नगरसेवकांकडून त्यांनी आपला सत्कार करवून घेतला होता. त्या कार्यक्रमाच्या आठवणी आजही चंद्रपूरकरांच्या मनात ताज्या आहेत. 

महानगरपालिकेने कोरोना काळात केलेल्या कामावरही अहीर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कारण महापालिकेवर भाजपची सत्ता आहे आणि महापौर मुनगंटीवार गटाच्या आहेत. आपल्‍या विरोधी गटावर ताशेरे ओढण्याची एकही संधी अहीर सोडत नाहीत, असे चित्र गेल्या काही काळात तयार झाले आहे. पण हे न करता गटबाजी संपुष्टात आणण्याचे प्रयत्न दोन्ही गटांकडून अद्याप तरी झालेले नाहीत. येत्या निवडणुकांमध्ये यश मिळवायचे असेल, तर उभय नेत्यांनी एकत्र येऊन गटबाजी मिटवण्याची नितांत गरज आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com