डॉ. विकास आमटेंनी का म्हटले होते की, डॉ. शीतल यांना शस्त्र परवाना देऊ नये ?

आत्महत्या की हत्या याचा पेच पोलिसांसमोर आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूला सहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पोलिसांनी त्या वापरत असलेले लॅपटॉप, टॅब, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज, इंजेक्‍शन, औषधी ताब्यात घेतली. आनंदवनातील संपर्कातील लोकांचे बयाण घेतले.
Sheetal Amte
Sheetal Amte

आनंदवन (चंद्रपूर) ः डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही उकललेले नाही. पोलिसांनी त्यांच्या कक्षातून ताब्यात घेतलेल्या वस्तू पुणेच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या आहेत, त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे. त्यामुळे चौकशीने पाहिजे तशी गती घेतलेली नाही. गेल्या महिन्यात आमटे कुटुंबीय हेमलकसा येथे गेले होते. तेव्हा डॉ. शीतल मानसिक तणावात असल्यामुळे त्यांना कुठलाही शस्त्र परवाना देऊ नये, अशी विनंती डॉ. विकास आमटे यांनी भामरागड पोलिसांना पत्र देऊ केली होती. 

डॉ. शीतल ही वडील विकास आमटे यांची खूप लाडकी होती. मुलगी मानसिक तणावात असल्याने तिची चिंता विकास आमटे यांना होती. ती शस्त्र परवाना घेऊन स्वतःचे काहीतरी बरेवाईट करेल, अशी भीती त्यांना असावी. त्यामुळे डॉ. विकास आमटे यांनी भामरागड पोलिसांना पत्र देऊन डॉ. शीतल आमटे यांना कोणताही शस्त्र परवाना देऊ नये, अशी विनंती केली होती. सदर पत्र भामरागड येथून एक पोलिस कर्मचारी घेऊन २८ नोव्हेंबर रोजी वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात पोहोचला होता.

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूला सहा दिवसांचा कालावधी लोटला. या कालावधीत पोलिसांनी आनंदवनातील दहा-बारा लोकांचे बयाण घेतले. करजगी कुटुंबीयांचेही बयाण घेण्यात आले. मात्र, अजूनही पोलिसांच्या हाती काही लागले नाही. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर तपासाची दिशा ठरेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
डॉ शीतल आमटे-करजगी यांनी ३० नोव्हेंबर रोजी आनंदवनातील राहत्या घरी विषारी इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केली. हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्याने पोलिस प्रशासन कमालीची गुप्तता पाळून आहे. सुरुवातीला पोलिसांनी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या खोलीतून मोबाईल, खोलीतील सीसीटीव्ही फुटेज, औषधांचा साठा ताब्यात घेतला. या वस्तू नागपूर येथून पुणे येथील फॉरेस्निक लॅबमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. त्याचा अद्याप अहवाल यायचा आहे. डॉ. शीतल या डावखुऱ्या नसतानाही त्यांच्या उजव्या हातावर इंजेक्‍शनची खूण आहे. 

ती आत्महत्या की हत्या याचा पेच पोलिसांसमोर आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूला सहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पोलिसांनी त्या वापरत असलेले लॅपटॉप, टॅब, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज, इंजेक्‍शन, औषधी ताब्यात घेतली. आनंदवनातील संपर्कातील लोकांचे बयाण घेतले. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शोधण्यात पोलिसांचा वेळ जात आहे. डॉ. शीतल आमटे या मानसिक तणावात होत्या. ही बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली असली तरी आत्महत्या की हत्या हे गूढ कायम आहे. हाय प्रोफाईल प्रकरण असल्याने पोलिसही कमालीची गुप्तता पाळून आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com