लोकांना का वाटते की, ‘हा’ कुत्रा महावितरणचा अधिकारी असायला हवा होता ? - why do people think that this dog should have been msedcl officer | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

लोकांना का वाटते की, ‘हा’ कुत्रा महावितरणचा अधिकारी असायला हवा होता ?

गजानन काळुसे
बुधवार, 16 जून 2021

कर्मचाऱ्यांच्या नावावर कार्यालयात चिटपाखरूही दिसणार नाही. पण हा कुत्रा मात्र नेहमीच दिसतो. त्यामुळे हा कुत्राच अधिकारी असता तर...

सरकारनामा सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : सिंदखेड राजा Sindakhed Raja येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात MSEDCL Office अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहात नाही. त्यामुळे तालुक्यातील लोक त्रस्त झाले आहेत. कुणीही कार्यालयात गेले की तेथे कुणीच राहात नाही. पण एक कुत्रा मात्र नेहमी तेथे बसलेला असतो. A dog, however, is always sitting there अनेकांना नेहमीच कुत्रा तेथे दिसला आहे. त्यामुळे हा कुत्राच या कार्यालयाचा अधिकारी असता, तर आपली कामे तरी झाली असती, अशी भावना लोक सहजच बोलून दाखवतात. 

महावितरणच्या येथील कार्यालयाला शेतकरी आणि सामान्य लोक वैतागले आहेत. कार्यालयात कुणीच राहात नसल्यामुळे समस्या सांगायच्या कुणाला, असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. कर्मचाऱ्यांच्या नावावर कार्यालयात चिटपाखरूही दिसणार नाही. पण हा कुत्रा मात्र नेहमीच दिसतो. त्यामुळे हा कुत्राच अधिकारी असता तर... असा प्रश्‍न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे. या कार्यालयात कार्यालयीन वेळेत कुणीच राहात नसल्यामुळे लोकांनी तहसीलदार सुनील सावंत यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. ते ती या समस्येवर उपाय काढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

अनेक दिवसांपासून शेतकरी विद्युत महावितरण कार्यालयात वीज पुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून सतत पाठपुरावा करीत आहेत. त्यांना महावितरणच्या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. परिणामी विद्युत पुरवठा करण्यात आला नाही. सध्या शेतीची पेरणी व लागवडीची कामे सुरू आहेत. शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना महावितरणच्या कार्यालयात विनाकारण चकरा माराव्या लागत आहेत. कार्यालयात वेळोवेळी केल्यानंतर त्याठिकाणी कोणत्याही अधिकारी व कर्मचारी उपस्थित दिसत नाही. त्यामुळे शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शेतांतील फळबागा सुकत चालल्या आहेत. शेतातील फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सुनील चौधरी, पंकज चौधरी, नंदू ठाकरे, कन्हैयालाल ठाकरे, सतीश मेहेत्रे, सचिन ठाकरे, सखाराम चौधरी, विलास मेहेत्रे, कुंडलिक चौधरी, शिवा ठाकरे, निलेश मगर या शेतकऱ्यांनी केली आहे. 

हेही वाचा : ओबीसी आरक्षण : महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष ठरवून वेगवेगळी नाटकं करत आहेत...

महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये कुत्र्याची २४ तास उपस्थिती असल्याचा अजब प्रकार पाहायला मिळत आहे. तालुक्याचा विस्तार मोठा असल्यामुळे अनेक शेतकरी दररोज महावितरणच्या कार्यालयात आपल्या समस्या घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी येत असतात. कार्यालयात कोणी उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांना रित्या हाताने परतावे लागते. या कार्यालयात लोकांना कर्मचारी कमी व कुत्रा जास्त वेळ पाहायला मिळतो. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्या. जेणेकरून सामान्य वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटतील. कार्यालयात कुत्र्याची पूर्ण वेळ उपस्थिती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख