वडेट्टीवारांनी ‘तो’ फोटो सोशल मिडियावरून का डिलीट केला ?

शहरवासीयांनी समाज माध्यमावर मनपाला चांगलेच आडव्या हाताने घेतले. छायाचित्रात उपस्थितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काहींनी तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. एवढेच नव्हे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही संधी सोडली नाही.
Vijay Wadettiwar - Chandrapur NMC
Vijay Wadettiwar - Chandrapur NMC

चंद्रपूर : अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे ५० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन Inauguration of 50-bed Kovid Hospital नुकतेच पार पडले. उद्घाटन कार्यक्रमानंतर महापौरांसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी फोटोसेशन केले. Officers and office bearers along with the mayor held a photo session पण हे करताना कोविडच्या नियमांची ऐसीतैसी केली गेली. याचा फोटो सोशल मिडियावर टाकत ‘भाजप ढोंगी पक्ष BJP hypocritical party असून पंतप्रधानांपासून तर महापौर, नगरसेवकांपर्यंत सारेच कोरोना वाढीसाठी विविध उपक्रम राबवीत आहेत’, असा टोला पालकमंत्री विजय वडेट्टीवार Guardian Minister Vijay Wadettiwar यांनी हाणला. पण आज तो फोटो सोशल मिडियावरून डिलीट करण्यात आला. तो फोटो वडेट्टीवारांकडून डिलीट का करण्यात आला, Why the photo was deleted by Vadettiwar या चर्चांना आता पेव फुटले आहे. 

झाले असे की, महानगरपालिकेने ५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले. त्याचे उद्घाटन मंगळवारी केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर फोटोसेशनही केले. पण हे करताना कोरोनासंबंधिचे नियम पाळण्यात आले नाही आणि हा फोटो पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोशल मिडियावर शेअर केला. त्यानंतर चंद्रपूरकरांनी महानगरपालिकेला आडव्या हाताने घेतले. पण वडेट्टीवार यांनी शेअर केलेला फोटो आज डिलीट करण्यात आला होता. त्यामुळे आता त्याबाबद विविध चर्चांना उधाण आले आहे. 

‘कोविड रुग्णालय आसरा आणि आता मास्क, सोशल डिस्टन्सिंग विसरा’, अशी जोरदार चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरू आहे. त्याला कारणीभूत ठरले मनपा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे फोटोसेशन. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सुद्धा हे फोटोसेशन समाज माध्यमावर टाकण्याचा मोह आवरला नाही. यासोबत अशा बेजबाबदार वागण्यासाठी शहरवासीय सोशल मिडियावर महापौर आणि अधिकारी, पदाधिकाऱ्यांना आडव्या हाताने घेताना दिसले. 
 
स्थानिक वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे ५० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्‌घाटन मंगळवारी पार पडले. या उद्‌घाटनंतर महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर, उपमहापौर राहुल पावडे, महापौरांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेवक संदीप आवारी यांच्यासह मनपा अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचारी यांनी सामूहिक फोटोसेशन केले. एखाद्या कार्यक्रमानंतर सामूहिक छायाचित्र घेणे सामान्य बाब आहे. मात्र ‘या’ छायाचित्रामुळे कोविड संसर्ग थांबविण्यासाठी मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या मनपाच्या प्रयत्नांवर पाणी पडले. 

महापौर, आयुक्त यांच्यासह छायाचित्रात अपवाद वगळता कुणीच मास्क लावलेला नाही. सोशल डिस्टंन्सिग पायदळी तुडविले. 
विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मनपा दंड ठोठावते. संचारबंदीत दुकान उघडल्यास कारवाई करते. कोविड संसर्ग टाळण्यासाठी लाखो रुपये जनजागृतीवर मनपाने खर्च केले. आताच त्याच मनपाच्या जबाबदार पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनाचा पुरावा छायाचित्राच्या माध्यमातून समोर आला आहे. 

शहरवासीयांनी समाज माध्यमावर मनपाला चांगलेच धारेवर धरले. छायाचित्रात दिसत असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काहींनी तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. एवढेच नव्हे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही संधी सोडली नाही. या छायाचित्राआडून भाजपवर टीकास्त्र सोडले. दरम्यान हे छायाचित्र समाज माध्यमांवर पसरल्यानंतर मनपा पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली. छायाचित्र काढण्यासाठी एकाच व्यक्तीची नेमणूक केली होती. त्यामुळे हे छायाचित्र बाहेर गेलेच कसे? असा संशयकल्लोळ आता सुरू आहे. उत्साहाच्या भरात केलेल्या फोटासेशनच्या यानिमित्ताने मात्र चांगल्याच चिंधड्या लोकांनी उडविल्या.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com