लोकांना बघून का पळाले खासदार सुनील मेंढे ?

जनतेसाठी घालून दिलेले नियम त्यांना लागू होत नाहीत काय, असा संतप्त सवाल लोकं आता करीत आहेत. जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांनी खासदारांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करावी. पण त्याहीपूर्वी नैतिक जबाबदारी स्विकारुन सुनील मेंढे यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा.
MP sunil Mendhe in saloon
MP sunil Mendhe in saloon

भंडारा : भंडारा-गोंदीयाचे खासदार सुनील मेंढे विदर्भ हाऊसिंग कॉलनीमधील लुक्स सलुनमध्ये दाढी-कटींग करीत होते. तेवढ्यात काही लोकं तेथे आले आणि त्यांना बघून काहीही न बोलता खासदारांनी चक्क तेथून पळ काढला. कारण ती वेळ होती रात्री ११ वाजताची. सायंकाळी सात वाजेनंतर दुकाने बंद करावी, असा नियम सरकारने घालून दिला आहे. या नियमाची खासदारांनीच ऐसीतैसी केली. काही जागरुक नागरिकांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, असता त्यांनी काहीही न बोलता तेथून काढता पाय घेतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोरोनाशी लढताना शासनाने घालुन दिलेले नियम पाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. सर्वत्र लोकप्रतिनिधी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन करताना दिसतात. मात्र भंडारा येथे खासदारांनीच कोविडच्या नियमांची ऐसीतैसी केल्यामुळे लोक संतापले आहेत. सामान्य नागरिकावर तत्काळ कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्या खासदार सुनील मेंढेंनाही शिक्षा झाली पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे. नागरिकानी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून खासदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा
खासदार सुनील मेंढे यांनी आमदार, जिल्हाधिकारी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन कोरोनाच्या नियंत्रणासाठी नियमावली तयार केली. स्वतः मात्र रात्री ११ वाजता सलुनमध्ये दाढी, कटींग केली. त्यांनी जनतेसाठी घालून दिलेले नियम त्यांना लागू होत नाहीत काय, असा संतप्त सवाल लोकं आता करीत आहेत. जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांनी खासदारांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करावी. पण त्याहीपूर्वी नैतिक जबाबदारी स्विकारुन सुनील मेंढे यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

असा लोकप्रतिनिधी नको
खासदारांनीच अधिकाऱ्यांच्या बैठकीत शनिवार आणि रविवार दोन दिवसाचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन जनतेला केले आणि स्वतः मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री ११ वाजता दाढी कटींग करीत बसले होते. मग नियम काय फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का? आम्ही खासदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी चक्क पळ काढला. असा लोकप्रतिनिधी आमच्या जिल्ह्याला नको, असे सारंग चकोले आणि प्रशांत खोब्रागडे यांच्यासह नागरिकांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.   (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com