गडकरी का म्हणाले की, हे रेल्वेचे अधिकारी काही बरोबर नसतात...

राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरपूर परिश्रम घेतले. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनीही हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून केंद्र सरकारकडे चांगलाच पाठपुरावा केला.
Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : महारेलअंतर्गत आज कडबी चौक ते पहलवान बाबा दर्गापर्यंतच्या रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन होते आहे. नागपूरकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. महारेलसोबत काम करण्याची संकल्पना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Former Chief Minister Devendra Fadanvis यांनी माझ्यापुढे मांडली होती. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की, हे रेल्वेचे अधिकारी काही बरोबर नसतात आणि हे मी जाहीरपणे अनेकदा बोललो आहे. पण एम.डी. जयस्वाल M.D. Jaiswal यांच्यासारखे चांगले अधिकारीही असतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari आज म्हणाले. 

ही कल्पना पुढे काम करणार नाही, असे मी फडणवीसांना बोललोही होतो. पण अधिकारी कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण एम.डी. जयस्वाल आहेत, असे म्हणत गडकरींनी त्यांच्या कामाचा गौरव केला. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास कुंभारे, आमदार राजू पारवे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, महारेलचे एम. डी. जयस्वाल उपस्थित होते.

ज्याप्रमाणे दिक्षीतांनी मेट्रोचे काम केले आणि करत आहेत, त्याचप्रमाणे जयस्वाल यांनीही महारेलअंतर्गत चांगले काम केले आहे. आज या भागात उड्डाणपूल होणे ही अशक्य गोष्ट होती. कारण मी या भागात स्कूटरने फिरलेलो आहे. एखादा रस्ता अतिक्रमण करून कसा बंद करता येऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा परिसर आहे. त्यातही जयस्वाल यांनी उत्तम डिझाईन आणि उत्कृष्ट नियोजन करून हे काम आज सुरू केले आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे गडकरी म्हणाले.

आपल्याकडे नागपूर उमरेड छोटी रेल्वे लाइन होती, तिचे ब्रॉडगेजचे काम सुरू झाले आहे. भारत सरकारने जेवढे पैसे दिले, तेवढेच पैसे महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाने दिले. पंजाब नॅशनल बॅंकेकडूनही कर्ज घेण्यात आले आहे. महारेल हा प्रकल्प पूर्ण करत आहे. या प्रकल्पाला ऊर्जामंत्री याठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. कोराडी आणि खापरखेड्याच्या प्रकल्पासाठी जो कोळसा यायचा, त्याला २२ तास लागायचे. कारण तो कोळसा आधी बुटीबोरीला जायचा आणि तेथून मग कोराडी खापरखेड्याया यायचा. ट्रॅफिकमध्ये जास्त वेळ जात होता. पण आता हाच कोळसा केवळ दोन ते तीन तासांतच येणार आहे. त्याचा फायदा कोराडी आणि खापरखेडा दोन्ही प्रकल्पांना होणार आहे. 

हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी  राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरपूर परिश्रम घेतले. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनीही हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून केंद्र सरकारकडे चांगलाच पाठपुरावा केला. मला त्यांनी अनेकवेळा फोन केले आणि नीती आयोगातून काम करण्यासाठी प्रत्यक्ष भेटी घेतल्या. आमदार राजू पारवे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यासाठी भरपूर प्रयत्न केले. आज सर्वांच्या प्रयत्नांतून या कामाची सुरुवात होत आहे. महारेलने उत्तम काम केले आहे. आज सेंट्रल रोड फंडातून या कामासाठी निधी देत आहे. याची स्थापना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून झाली असल्याची माहितीही यावेळी नितीन गडकरी यांनी दिली.  
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com