१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट सवाल…

बाळासाहेब ठाकरे या राज्याचे रक्षणकर्ते होते. राज्यातील १२ कोटी जनतेला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वात राज्याने प्रगती केली.
१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट सवाल…
Chandrashekhar Bawankule

बुलडाणा : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. जिवाच्या भीतीने जनता उपचार मिळविण्यासाठी धडपडत होती. या काळात राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मोठी होती. The Chief Minister Uddhav Thackeray पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १४ महिने मंत्रालयात आलेच नाहीत आणि असा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा, असा थेट सवाल करीत माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे Former Energy Minister Chandrashekhar Bawankule यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

पंचम या संस्थेने सर्व्हे करून उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली आहे, असे विचारल्यावर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, हा सर्वे कुणी केला माहिती नाही. पण असा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये काय ५० मध्येही येऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेला विचारा, लोकच तुम्हाला सांगतील की, असा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही आणि पहिल्या पाचमध्ये येणे शक्य नाही. विदर्भात अधिवेशन घ्यायला जे घाबरतात, ते मुख्यमंत्री उत्कृष्ट कसे असू शकतात, असाही सवाल बावनकुळे यांनी केला. 

मुख्यमंत्री म्हणून खरे काम जर कुणा केले असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी. सकाळी ९ वाजतापासून रात्रीचे ३ वाजेपर्यंत मंत्रालयात, रामगिरीमध्ये आणि वर्षा या निवासस्थानी त्यांनी काम केले आहे. जिवाचे रान करून त्यांनी राज्यासाठी निधी आणि कामे खेचून आणली आहेत. त्यांच्या काळात राज्य विकासाच्या वाट्यावर निघाले होते. खरी विकासाची कामे कुणी केली असेल, तर ती माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. भविष्याचा वेध घेणारे आणि उत्कृष्ट व्हिजन असणारे मुख्यमंत्री फडणवीस होते. या मुख्यमंत्र्यांमध्ये ती बात नाही, असे बावनकुळे यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

हे तर संकुचित वृत्तीचं लक्षण…
बाळासाहेब ठाकरे या राज्याचे रक्षणकर्ते होते. राज्यातील १२ कोटी जनतेला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वात राज्याने प्रगती केली. त्यांना स्मरण करणे, त्यांना आदरांजली अर्पण करणे हे राज्याची जनता करूच शकते. पण भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसेनेने स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण करणे हास्यास्पद आहे. हे त्यांच्या संकुचित विचार बुद्धीचं लक्षण आहे. संकुचित विचारसरणीने माणूस कधीही मोठा होत नाही, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टिका केली. अशा संकुचित वृत्तीच्या लोकांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही, असेही ते म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in