"कोरोना तपासणीत झालेल्या हयगयीला जबाबदार कोण?' 

अमरावती शहरात कोरोना रूग्णांचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. परंतु, केवळ अमरावती विद्यापीठातच करोना तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महालिद्यालय व रूग्णालय नसल्याने कोरोनाच्या तपासणीचा वेग मंदावला आहे.
Hammer Court
Hammer Court

नागपूर : अमरावती शहरात कोरोना रूग्णांच्या अत्यंत जवळच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीत हयगय झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, या हयगतीला कोण जबाबदार आहे, त्याची माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला. 

अमरावती शहरात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असून प्रशासनाकडून त्यावर नियंत्रणासाठी आवश्‍यक उपययोजना करण्यात येत नसल्याचा दावा करणारी याचिका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेनुसार, अमरावती शहरात कोरोना रूग्णांचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. परंतु, केवळ अमरावती विद्यापीठातच करोना तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महालिद्यालय व रूग्णालय नसल्याने कोरोनाच्या तपासणीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे, राजस्थान येथील भिलवाडा पॅटर्नचे अमरावतीत अनुकरण करावे, येथींल प्रत्येकाची करोना तापसणी करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमरावती महापालिका आयुक्तांनी सिव्हील सर्जनकडे एका कोरोना रूग्णाच्या 16 अति धोकादायक आणि 43 कमी धोकादायक संपर्कातील लोकांना तपासणीला पाठवले होते. त्यापैकी केवळ आठच जणांच्या स्वॅबचे नमूने घेण्यात आलेत. तसेच, त्या लोकांना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तपासणी केंद्रावर बसवून ठेवण्यात आले. 

याशिवाय अन्य प्रकरणांत 19 प्राथमिक संपर्कातील आणि 43 अल्प धोकादायक संपर्कातील व्यक्तींनाही तपासणीला पाठवले होते. त्यापैकी 13 जणांचे नमूने घेण्यात आले. परिणामी, तपासणी केंद्रावर गोंधळ उडाला होता. याप्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. नागरिकांना तापसणी केंद्रांवर तासनतास अन्न-पाण्याविना बसवणे योग्य नाही, त्यांच्यासाठी आवश्‍यक त्या सोयी तिथे उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. तर आरोग्य अधिकारी निकम यांना उच्च न्यायालयाने झालेल्या संपूर्ण प्रकरणावर शपथपत्र दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, असे निकम यांनी उच्च न्यायालयात नमूद केले. 

तपासणी केंद्रात झालेल्या प्रकाराला कोण अधिकारी जबाबदार आहे, अशी विचारणा करीत जबाबदारी निश्‍चित करून शपथपत्र दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे पंकज नवलानी यांनी, अमरावती महापालिकेतर्फे जेमिनी कासट यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती रोहित देव यांच्या समक्ष सुनावणी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com