इतर आमदार पत्रही देत नसताना वंजारी मात्र एक कोटी वाटूनही मोकळे झाले... - while other mlas were not even giving letters wanjari distributed one crore | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

इतर आमदार पत्रही देत नसताना वंजारी मात्र एक कोटी वाटूनही मोकळे झाले...

राजेश चरपे
शनिवार, 1 मे 2021

विदर्भात कोरोनाची परिस्थिती विदारक आहे. दुर्गम भागातील नागरिक शहराकडे येत आहेत. अनेक ठिकाणी खाटा मिळत नाही. औषधांचा तुडवडा जाणवत आहे. राज्य सरकारतर्फे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. तरीही परिस्थिती आटोक्यात येत नाही. त्याकरिता आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी निधी देणे आवश्यक आहेत.

नागपूर : कोरोना महामारीच्या विरोधातील लढा यशस्वीपणे लढता यावा, यासाठी राज्य सरकारने आमदारांना एक कोटी रुपयांचा अतिरिक्त दिला. पण बव्हंशी आमदारांचा तो खर्च करण्याची तयारी दिसत नाही. जिल्ह्यातील काही मोजक्याच आमदारांनी पत्र देऊन निधी देण्याची तयारी दर्शविली. असे असताना आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी एक कोटी रुपयांचे वाटप करून मोकळे झाले आहेत. 

अभिजित वंजारी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. ते एकूण सहा जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. निधी वाटप करताना तो सर्वच जिल्ह्यांना मिळावा याचीही खबरदारी त्यांनी घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीकरिता ४० लाख रुपये, वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाला नवीन सुसज्ज रुग्णवाहिका खरेदीकरिता प्रत्येकी २ लाख रुपये तसेच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयाला नवीन सुसज्ज रुग्णवाहिका खरेदीकरिता प्रत्येकी २० लाख रुपये त्यांनी दिले आहे. तसेच बुटीबोरीतील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांच्या सुविधेकरिता वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी १० लाख रुपये, शासकीय वैद्यकीय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालयाकरिता १० लाख रुपयांचा निधी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता वाटप करण्यात आला. 

विदर्भात कोरोनाची परिस्थिती विदारक आहे. दुर्गम भागातील नागरिक शहराकडे येत आहेत. अनेक ठिकाणी खाटा मिळत नाही. औषधांचा तुडवडा जाणवत आहे. राज्य सरकारतर्फे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. तरीही परिस्थिती आटोक्यात येत नाही. त्याकरिता आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी निधी देणे आवश्यक आहेत. एक कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केले. शक्य तेवढी मदत आपण करणार असल्याचे अभिजित वंजारी यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख