भाजप टार्गेट करत असताना आदित्य यांचा तुकाराम मुंढेंना असाही पाठिंबा...

नागपुरात सद्यस्थितीत 500 खाटा तयार आहेत आणि जर आवश्‍यकता भासली तर त्याची क्षमता 5000 पर्यंत केली जाऊ शकते, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती मंत्र्यांना दिली. केंद्र शासनाच्या पथकानेसुध्दा नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमाने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे.
Aditya Thackeray - Tukaram Mundhe
Aditya Thackeray - Tukaram Mundhe

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नागपुरातील मृत्युदर सर्वात कमी राहिलेला आहे. रुग्णसंख्याही इतर शहरांच्या तुलनेत नियंत्रणातच आहे. यासाठी सुरूवातीपासूनच कॉंटॅक्‍ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला. उपचाराची वेगवान पद्धत अवलंबिण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंढेंनी पाच हजार खाटांची व्यवस्था असलेले सेंटरही तयार केले आहे. राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले आणि आयुक्तांच्या कामाचीही स्तुती केली. 

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी नागपूर, नाशिक आणि औरंगाबादच्या मनपा आयुक्तांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका आणि नावीन्यपूर्ण उपाय करुन नागपुरात कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केले. त्यांनी कॉंटॅक्‍ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि शीघ्र उपचारांची व्यवस्था केली. आता राज्याच्या इतर ठिकाणी सुध्दा कॉंटॅक्‍ट ट्रेसिंगवर जोर दिला जात असल्याचे ठाकरे म्हणाले. महानगरपालिकेने घरोघरी सर्वेक्षण, समूह विलगीकरण रणनितीवर जास्त भर दिला पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी महापालिकेला केल्या. ठाकरे यांनी महानगरपालिकेव्दारे कळमेश्वर येथील राधास्वामी सत्संग न्यास येथे उभारण्यात आलेल्या पाच हजार खाटांच्या कोविड केअर सेंटरचीही प्रशंसा केली. 

500 खाटा तयार आहेत आणि जर आवश्‍यकता भासली तर त्याची क्षमता 5000 पर्यंत केली जाऊ शकते, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती मंत्र्यांना दिली. केंद्र शासनाच्या पथकानेसुध्दा नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमाने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या 500 पर्यंत नेली. घरोघरी सर्वेक्षण, गरोदर स्त्रिया, टी.बी. रुग्ण, कुष्ठरोगी, कर्करोगी रुग्णांची विशेष तपासणी आणि विशेष काळजी घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. आयुक्त मुंढे यांनी राज्य शासनाकडे अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट एम्बुलेंस) देण्याची विनंती केली. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.  (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com