बेड मिळत नव्हता, तेव्हा कुठे होते? अन् आता कसे उगवले निवडणुकीच्या तोंडावर…

अर्थपूर्ण समाधान शोधणं हाच नगरसेवकांसमोर पर्याय आहे. नुसत्या एकतर्फी पोस्ट्स करून नुकसानच आहे. कारण ‘ये पब्लिक है, ये अब सोशल मीडिया भी जानती है’, असं एखादं गाणं सोशल मिडियावर गाजायला लागल्यास नवल वाटायला नको.
Leader's Cartoon
Leader's Cartoon

नागपूर : सोशल मिडियावर चमकोगिरी करणाऱ्या नगरसेवकांचे सध्या चांगले दिवस नाहीत. कारण कोरोना प्रकोपाच्या काळात जनता जेव्हा अडचणीत होती, तेव्हा बव्हंशी नगरसेवक गायब होते. अन् आता महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्यानंतर सोशल मिडियावर चमकायला लागले आहेत. त्यामुळे ‘कोरोनाच्या टायमाला बेड मिळत नव्हता, तेव्हा कुठे होते? अन् आता कसे उगवले निवडणुकीच्या तोंडावर…’, असे म्हणत मतदार आता नगरसेवकांचा हिशेब घायला लागले आहेत. त्यामुळे हायटेक प्रचार करणे आता नगरसेवसांसाठी सोपे राहिलेले नाही. Pramoting high teck is no longer for the corporters. 

नागपूर महानगरपालिका निवडणूकीला सहा महिने बाकी आहेत, पण तरीही कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीत मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांच्या नगरसेवकांनी सोशल मिडियाद्वारे हायटेक पण एकतर्फी प्रचार सुरू केला आहे. पण सोशल मिडियाच्या मदतीनं नगरसेवकांनी प्रचार सुरू केल्यानंतर, त्यांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागतो आहे. सोशल माध्यमावर मतदारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याच प्लॅटफॉर्मवर उत्तरं देताना नगरसेवकांची भंभेरी उडत असल्याचा कटू अनुभव सध्या नागपुरातील अनेक नगरसेवक घेत आहेत. 

या नव्या डोकेदुखीला सामोरं कसं जायचं, यासाठी नगरसेवक आता तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याची बाब, निदर्शनास आली आहे. "सोशल माध्यमावरील हायटेक प्रचार करताना, त्यावर मतदारांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर त्याचा विपरीत परिणाम संबंधित नगरसेवकावर होऊ शकतो, त्यामुळे  सोशल मिडिया निवडणुकीतलं एक दुधारी हत्यार म्हणून त्याकडे बघणं गरजेचं आहे, त्यामुळे सोशल मिडियावर विचारलेल्या प्रश्नांची तिथेच उत्तर देणं गरजेचं आहे , पोस्ट्स  ह्या एकतर्फी नकोच" असं मत सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर महानगरपालिकेत सध्या भाजपचे १०८, काँग्रेसचे २९, बसपाचे १०, शिवसेना ०२, राष्ट्रवादी ०१ आणि अपक्ष ०१, असं संख्याबळ आहे. १५१ पैकी सर्वाधिक जागा भाजपकडे आहेत. पण १५ वर्षांच्या सत्तेमुळे भाजपसाठी ही निवडणूक नक्कीच सोपी नाही. शिवाय काँग्रेसनेही यावेळेस जोर लावलाय. त्यामुळे सहा महिन्यांआधीपासूनंच सोशल मिडियावर निवडणुकीच्या प्रचाराची रंगत सुरू झाली आहे. पण उलट प्रश्नांमुळे सिटिंग नगरसेवकांची डोकेदुखी वाढली आहे. "निवडणुकीच्या आधी उगवले का? आम्हाला कोरोनात बेड मिळत नव्हता, तेव्हा तोंड दाखवलं नाही, इथपासून तर लायकी काढण्यापर्यंत, अनेक प्रश्नांचा भडिमार लोक आपआपल्या नगरसेवकांना सध्या सोशल मिडियावर विचारत आहे. 

सोशल मिडियावर फक्त भूमिपूजन किंवा चमकोगीरीचे फोटो टाकण्यात धन्यता मानणाऱ्या नगरसेवकांना, या प्रश्नांची काय आणि कशी उत्तरं द्यायची? हे सुचत नसल्याने सध्या सोशल मिडियावरील हायटेक पण दिशाहीन प्रचार नगरसेवकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. काही नगरसेवक लग्नाचे अल्बम दाखवल्याप्रमाणे सोशल फोटो अपलोड करतात, पण आता लोकं जागरूक झालेत. त्यांना तुमच्या पोस्टवर बोलू द्या, फक्त नेतेच बोलणार असं नाही, कारण सोशल मिडियावर आता एकतर्फी संवादाला वाव नाही, त्यामुळे नगरसेवकांना आता भूमिपूजन ते उद्घाटन, अशा सर्व बाबींचा हिशेब द्यावा लागणार आहे” अशी बाब सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांच्या सामाजिक माध्यमांवरील प्रचाराच्या अभ्यासातून लक्षात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

इंटरनेटच्या या युगात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची मोठी संख्या आहे. एका आकडेवारीनुसार नागपूर शहरातील एकूण मतदारांपैकी जवळपास ४० टक्क्यांपेक्षा जास्त मतदार सोशल मिडियाचा वापर करतात. कोरोना आणि लॉकडाऊन या काळात लोकांनी बराच वेळ घरांतंच घालवला, त्यामुळे सोशल माध्यमाबाबत लोकांची जागरुकताही वाढली आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी आता आपले नगरसेवक सोशल माध्यमावर प्रचार करताना दिसले, की नाराज असलेले मतदार त्यांच्यावर तुटून पडतात.. पुढील  काळात नगरसेवकांसमोरची ही डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे हायटेक प्रचार करायचा असेल, तर या डोकेदुखीवर अनुभवी, अर्थपूर्ण समाधान शोधणं हाच नगरसेवकांसमोर पर्याय आहे. नुसत्या एकतर्फी पोस्ट्स करून नुकसानच आहे. कारण ‘ये पब्लिक है, ये अब सोशल मीडिया भी जानती है’, असं एखादं गाणं सोशल मिडियावर गाजायला लागल्यास नवल वाटायला नको.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com