आला.. आला... व्हॉट्‌सऍपला स्वदेशी पर्याय आला... "भारत मॅसेंजर' 

महागड्या मोबाईलमधील व्हॉट्‌सऍपची जागा घेणारा भारत मॅसेंजर नावाचा हा नवीन पाहुणा वाराणसीत जन्माला आलेला आहे. यात सोळा ते पन्नास एमबीपर्यंतचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. वर्ड, एक्‍सेल व ऍडोबच्या फाइल पाठविता येणार असून, ऍप वापरण्याची पद्धत व्हॉट्‌सऍप सारखीच आहे.
Bharat Masanger
Bharat Masanger

नागपूर : दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत उदयाला आलेल्या व्हॉट्‌सऍपने जगभरात धमाल उडवून दिली. फार अल्प काळात या ऍपने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हक्‍काचे स्थान निर्माण केले. व्हॉट्‌सऍपने केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगातील लोकांच्या जीवनशैलीतही मोलाचे बदल घडविले. मात्र, आता काळ स्वदेशीचा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या ग्रुपवर चर्चा रंगते आहे ती भारतीय बनावटीच्या भारत मॅसेंजरची. 

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जगाने बघता बघता चीनच्या वस्तूंना बॉयकॉट करणे प्रारंभ केले आहे. याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मोबाईलमधील चीन बनावटीचे ऍपदेखील अनइन्स्टॉल करणे प्रारंभ केले आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका बसला असेल तर तो टिकटॉकला. अनेकांनी टिकटॉक ऍपला बाहेरचा रस्ता दाखविला असून, आता व्हॉट्‌सऍप मॅसेंजरलाही पर्याय उपलब्ध झाला असल्याने भारतीयांनी भारत मॅसेंजरला पसंती दिलेली आहे. 

सोनम वांगचूक यांनी नुकतेच भारतीयांना चिनी प्रॉडक्‍स बॉयकॉट करण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक युद्ध सीमेवर लढता येते असे समजू नका, तर देशातील सामान्य व्यक्‍तीलाही ते लढायचे आहे, असे वांगचूक म्हणाले होते. व्हॉट्‌सऍपचा जन्म दक्षिण अमेरिकेत झाला असला तरी व्हॉट्‌सऍपच्या धर्तीवर भारत मॅसेंजरचा चाहतावर्गदेखील झपाट्याने वाढतो आहे. एका समुदायाने तर एक जूनला सर्वांनी भारत मॅसेंजर डाउनलोड करून घ्या, असेदेखील आवाहन केले आहे. 

महागड्या मोबाईलमधील व्हॉट्‌सऍपची जागा घेणारा भारत मॅसेंजर नावाचा हा नवीन पाहुणा वाराणसीत जन्माला आलेला आहे. यात सोळा ते पन्नास एमबीपर्यंतचा व्हिडिओ पाठविता येणार आहे. वर्ड, एक्‍सेल व ऍडोबच्या फाइल पाठविता येणार असून, ऍप वापरण्याची पद्धत व्हॉट्‌सऍप सारखीच आहे. भारत मॅसेंजर प्ले-स्टोअरवर उपलब्ध असून, तो डाउनलोड करण्यासाठी अवघी 51 एमबीची जागा लागते. आत्तापर्यंत हे ऍप एक लाखाहून अधिक युझर्सने डाउनलोड केलेले आहे. व्हॉट्‌सऍप ग्रुपवर हा स्वदेशी भारत मॅसेंजर प्रत्येकाने डाउनलोड करावा, असे आवाहन सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com