तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो... 

खुमासदार भाषेत उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ मागची पाच वर्षे तुम्ही विसरलात. विदर्भाचे देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री झाले यामध्ये आनंद आहे. पण तुम्ही त्यांच्यापेक्षा किती सिनीअर होता. तरीही तुम्ही तुमचे दु:ख पाच वर्षे लपूनच ठेवले ना?
Anil Deshmukh - Sudhir Mungantiwar
Anil Deshmukh - Sudhir Mungantiwar

मुबंई : विधानसभेच्या अधिवेशनात गेल्या चार दिवसांपासून सतत तणावाचे वातावरण होते. सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकांविरोधात उभे ठाकल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पण विदर्भातील नेत्यांच्या जुगलबंदीने हा तणाव निवळला. तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो..., असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केला आणि संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ झाला. 

महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभलेली आहे. राजकीय दृष्टया एकमेंकांविरोधात असलेल्या नेत्यांचेही वैयक्तिक स्नेहबंध आहेत. त्याचेच प्रत्यंतर आज विधानसभेत आले. विदर्भातील मंत्र्यांना चांगली खाती दिली नाहीत, असा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. गृहमंत्र्यांना विकासाचे खाते देण्यापेक्षा आरोपींच्या मागे पळायला लावले, सुनील केदार यांना जलसंपदासारखे चांगले खाते दिले नाही आणि कोंबड्या, जनावरांचे खाते दिले. विजय वडेट्टीवार यांनाही मदत आणि पुनर्वसनसारखे दुय्यम खाते दिले, असे त्यांनी सांगितले. 

यावर खुमासदार भाषेत उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ मागची पाच वर्षे तुम्ही विसरलात. विदर्भाचे देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री झाले यामध्ये आनंद आहे. पण तुम्ही त्यांच्यापेक्षा किती सिनीअर होता. तरीही तुम्ही तुमचे दु:ख पाच वर्षे लपूनच ठेवले ना? अनेकदा तुम्हाला भेटायचो. सुधीरभाऊ क्यों मायूस हो? त्यावेळी सुधीरभाऊ हसायचे आणि म्हणायचे कोठे काय? मी कोठे नाराज आहे. पण तुमच्या मनातलं आम्हाला कळत होतं. माझा मुख्यमंत्रीपदाचा चान्स होता, पण माझा नंबर लागला नाही. तुम्हाला पाहून मला जगजितसिंह यांची एक गझल आठवते. तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो आखो में नमी हसी लबोंपे क्या हाल है क्या दिखा रहे हो ! ...

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या या बोलीने तणावपूर्ण असलेले सभागृहाचे वातावरण एकदम हलकेफुलके झाले. यावरून त्यांची संगीत, गझल्स यांची आवडही अधोरेखीत झाली. मागील काळात त्यांनी शीघ्रकवी म्हणून राजकारणात प्रख्यात असलेले भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनाही कवितेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. पण आज सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतरही बऱ्यास सदस्यांच्या तोंडी याच ओळी होत्या की, तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो आखो में नमी हसी लबोंपे क्या हाल है क्या दिखा रहे हो ! ...
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com