हे कसलं बचाव, ही तर नौटंकी : प्रविण कुंटे 

आजही भाजप शासित उत्तर प्रदेश, बिहारच्या सीमेवर लाखो मजूर उभे आहेत. त्यांना प्रवेश दिला जात नाही. अशी परिस्थिती असतानाही फडणवीस महाराष्ट्राचे कमी आणि दिल्लीश्‍वरांचे जास्त हित बघत आहेत. महाराष्ट्र हा दुटप्पीपणा सहन करणार नाही.
Devendra Fadanvis and Pravin Kunte
Devendra Fadanvis and Pravin Kunte

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर महाराष्ट्र बचावची घोषणा केली. त्यांची ही घोषणा निव्वळ नौटंकी असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता प्रविण कुंटे यांनी केला. हिंदुत्वाच्या बाता मारणाऱ्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो गरीब मजूरांनी हजारो किलोमीटर अंतर पायी कापावे लागत आहे. याला सर्वस्वी भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचेही कुंटे म्हणाले. 

ज्यावेळी आतंरराष्ट्रीय विमानसेवा बंद करणे गरजेचे होते, त्यावेळी भाजपचे नेते "नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाच्या आयोजनात व मध्यप्रदेश सरकार पाडण्याच्या कामात व्यस्त होते. अचानक 25 मार्चला रात्री 8 वाजता कुठलीही तयारी न करता देशात लॉकडाऊनचे फर्मान जारी करुन लाखो परप्रांतीय गरीब मजुरांची कोंडी केली. आजही भाजप शासित उत्तर प्रदेश, बिहारच्या सीमेवर लाखो मजूर उभे आहेत. त्यांना प्रवेश दिला जात नाही. अशी परिस्थिती असतानाही फडणवीस महाराष्ट्राचे कमी आणि दिल्लीश्‍वरांचे जास्त हित बघत आहेत. महाराष्ट्र हा दुटप्पीपणा सहन करणार नाही, असेही कुंटे यांनी म्हटले आहे. 

राज्यावर संकट असताना सर्व पक्षांसोबत एकदिलाने काम करण्याचे सोडून भाजपचे नेते राजभवनच्या माध्यमातून कारस्थाने करण्यात व सरकार संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे. शरद पवारांनी मोदींना पत्र लिहण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना पत्र लिहावे, असे सल्ले देणाऱ्यांनी उगाच राजभवनात जाऊन राज्यपालांच्या पाहुणचारच्या खर्चात वाढ करण्यापेक्षा महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडे जीएसटीचे 21 हजार कोटी रुपये अडकले आहेत, नव्हे अडवून ठेवले आहे. त्यासाठी पाठपुरावा करावा व आपली महाराष्ट्राबद्दल असलेली निष्ठा सिद्ध करावी, असेही प्रविण कुंटे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com