तुकाराम मुंढेंवरुन कॉंग्रेसमध्ये चाललय तरी काय ? 

कॉंग्रेसमधील नगरसेवकांच्या भूमिका वेगवेगळ्या दिसून आल्या. मात्र, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या भाषणातून ते आयुक्तांचा विरोध करीत आहे की समर्थन, हेच अनेकांना कळले नाही. बाहेरून विमानाने आलेल्या लोकांना विमानतळावर कोरोन्टाईन न केल्याने कोरोनाचा प्रसार झाल्याचे नमुद करीत त्यांनी आयुक्तांवर प्रहार केला.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : कॉंग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके आणि कमलेश चौधरी यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी करुन आणि सभागृहात सत्ताधाऱ्यांवर प्रहार करुन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा जोरदार बचाव केला. तर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी भाषणातून आयुक्तांचा कडाडून विरोध करताना त्यांचे कौतुकही केले. याशिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही त्यांनी केले. ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केले. त्यामुळे तुकाराम मुंढे या विषयावरुन महानगरपालिकेत कॉंग्रेसमध्ये येवढा गोंढळ होतोय त्यामुळे कॉंग्रेसमध्ये चाललय तरी काय, असा प्रश्‍न सभागृहात आणि सभागृहाबाहेरही प्रत्येकाला पडला आहे. 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांनी बचाव केला. काही नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर टिकास्त्र सोडत विकास कामे थांबविल्यामुळे स्पष्टपणे विरोध केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी भाषणातून विरोध करतानाच आयुक्तांचे स्वागतही केले. एवढेच नव्हे त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले अन्‌ सत्ताधाऱ्यांनी बाक वाजविली. एकूणच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरून महापालिकेत कॉंग्रेस पूर्णपणे गोंधळात असल्याचे चित्र आहे. 

महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या पाच दिवसीय सर्वसाधारण सभेत कॉंग्रेस सदस्य नितीन साठवणे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर संताप व्यक्त करीत चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर सलग चार दिवस सभा सुरू होती. सत्ताधारी बाकावरील सर्वच सदस्यांसह कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी आयुक्तांवर रोष व्यक्त केला. एवढेच नव्हे प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी महाराष्ट्र महापालिका कायद्यात आयुक्तांवर कारवाईचे अधिकार सभागृहाला नसेल तर अविश्‍वास आणावा, असे आव्हानच सत्ताधाऱ्यांना दिले. कॉंग्रेसचे बंटी शेळके व कमलेश चौधरी यांनी आपल्या भाषणातूनच नव्हे तर बाहेर समर्थनात नारे लावून आयुक्तांचा बचाव केला. आयुक्तांच्या भाषणादरम्यान प्रवीण दटके यांनी व्यत्यय आणल्याने कमलेश चौधरी यांनी आक्रमक होऊन आयुक्तांची बाजू लावून धरली. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे, हरीश ग्वालवंशी, रमेश पुणेकर व संजय महाकाळकर यांनी आयुक्तांवर थेट शरसंधान साधले. सहारे यांनी जनतेची कामे करीत असताना नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला, त्याप्रमाणे पालिकेतील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पुरावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दाखवा, असे आव्हान आयुक्तांना दिले. ग्वालवंशी यांनी मीपणा लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे नमुद करीत आयुक्तांना टोला हाणला. रमेश पुणेकर यांनी नगरसेवकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी केली. संजय महाकाळकर यांनी तर महापौरांना आयुक्ताविरोधात अविश्‍वास ठरावासाठी पत्र दिले. 

कॉंग्रेसमधील नगरसेवकांच्या भूमिका वेगवेगळ्या दिसून आल्या. मात्र, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या भाषणातून ते आयुक्तांचा विरोध करीत आहे की समर्थन, हेच अनेकांना कळले नाही. बाहेरून विमानाने आलेल्या लोकांना विमानतळावर कोरोन्टाईन न केल्याने कोरोनाचा प्रसार झाल्याचे नमुद करीत त्यांनी आयुक्तांवर प्रहार केला. त्याचवेळी त्यांनी आयुक्तांच्या कामाचेही कौतुक केले. यावेळी त्यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती वाईट असताना जीएसटीमध्ये वाढ करून दिल्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आपल्या भाषणातून थेट लक्ष्य केले. 

स्थगन मागे घेण्याबाबत पत्रानंतर सभागृहात समर्थन 
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी नगरसेवक नितीन साठवणे यांना स्थगन प्रस्ताव मागे घ्यावा, पक्षशिस्तीचा भंग केल्याबाबत कारवाईचा इशारा पत्रातून दिला. मात्र, साठवणेंवरील गुन्हा मागे घ्यावा, गुन्हा दाखल करणे योग्य नाही, असे नमुद करीत त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com