अग्निकांड रोखण्याची जबाबदारी फक्त दोन अधिपरिचारिकांची होती का?

चौकशी समिती स्थापन करून हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. यामध्ये अधिपरिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे बाळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. बालके तब्बल २१ मिनिटे धुरामध्ये रडत, गुदमरत होती. मात्र, अधिपरिचारिकांनी त्यांना बाहेर काढले नाही. त्यामुळे त्या बालकांचा मृत्यू झाला.
Parinay Fuke - Rajesh Tope - Bhandara
Parinay Fuke - Rajesh Tope - Bhandara

नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीला पहाटे लागलेल्या आगीत होरपळून, गुदमरून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. या अग्निकांडासाठी दोन अधिपरिचारिकांवर भंडारा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे अग्निकांड थांबवण्याची जबाबदारी फक्त या दोन अधिपरिचारीकांचीच होती का, असा प्रश्‍न आज विधानपरिषदेत भंडारा-गोंदिया क्षेत्राचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी विचारला. 

भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांड ज्या इनक्यूबेटर ब्लास्टमुळे झाले, त्या निष्कृष्ट दर्जाच्या इनक्यूबेटर सप्लायरवर आपण गुन्हे दाखल करणार काय? या अग्नीकांडाचा ठपका ज्या दोन अधिपरिचारिकांवर ठेवण्यात आला, खरंच त्या अधिपरिचारिकांवर जबाबदार होत्या का? की केवळ बळीचा बकरा म्हणून काही अधिकारी आणि त्या ठेकेदारांना वाचवण्याकरिता सरकारने अधिपरिचारिकांवर फसवण्याचं काम केले आहे, अशा प्रश्‍नांची सरबत्ती डॉ. फुकेंनी आज सभागृहात केली. ज्या संबंधित अधिकाऱ्यांमुळे गेले ३ वर्ष ही फाईल मंत्रालयातील टेबलावर धूळ खात होती, त्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का आणि संबंधित सिविल सर्जनपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या डॉक्टरांपर्यंत त्यांच्यावर आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहात का, असेही त्यांनी विचारल. 

या प्रश्नांची दखल घेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारने नेमलेल्या समितीने घटनेच्या चौकशीचा अहवाल दिल्यानंतर स्मिता संजयकुमार आंबिलढुके (वय ३४, रा. ग्रामसेवक कॉलनी, खातरोड, भंडारा) व शुभांगी यादवराव साठवणे (वय ३२, रा. सिव्हिल लाइन, राजगोपालाचारी वॉर्ड, भंडारा) या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून एकाचवेळी १० बालकांचा मृत्यू झाला होता. या अग्निकांडानंतर मातांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह तर डझनभर मंत्री, पुढाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली होती.. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 

चौकशी समिती स्थापन करून हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. यामध्ये अधिपरिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे बाळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. बालके तब्बल २१ मिनिटे धुरामध्ये रडत, गुदमरत होती. मात्र, अधिपरिचारिकांनी त्यांना बाहेर काढले नाही. त्यामुळे त्या बालकांचा मृत्यू झाला. दरम्यान, साकोलीचे उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार दोन्ही अधिपरिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेला केवळ अधिपरिचारिका जबाबदार नसून इनक्यूबेटर सप्लायरवर आणि दफ्तरदिरंगाई करणारे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी दोषी असल्याचा आरोप डॉ. फुके यांनी केला. त्यावर चौकशी करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com