वॉशरुमसाठी गेलो होतो सलुनमध्ये : खासदार सुनील मेंढे 

व्डिडिओ व्हायरल करुन केवळ आणि केवळ मला बदनाम करण्याचे प्रयत्न कुणीतरी करीत आहे. याबाबत भंडारा नगर परिषदेने आधीच त्या सलून मालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. असे असताना लोकांना भ्रमित करण्यासाठी वीडियो वायरल केल्याचे खासदार मेंढे यांनी सांगितले.
Sunil Mendhe
Sunil Mendhe

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता विदर्भ हाउसिंग कॉलनीतील लुक्स नावाच्या सलुनमध्ये दाढी, कटींग केली होती. काही नागरिकांनी त्याचा व्हिडिओ काढला आणि शनिवारी दुपारपर्यंत व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या प्रकाराबाबत ‘वॉशरुमसाठी मी त्या सलुनमध्ये गेलो होतो.’, असे स्पष्टीकरण ‘सरकारनामा’शी बोलताना खासदार मेंढे यांनी दिले. 

खासदार मेंढे म्हणाले, रात्री उशिरा लाखांदूर येथील बैठक आटोपून मला नागपूरला जायचे होते. जाताना रात्रीच्या वेळी सलून उघडे दिसले. त्यामुळे त्या दुकानदाराला येवढ्या उशिरा दुकान उघडे कसे, याबाबत विचारणा केली. त्यावर एअरकंडीशनरची दुरुस्ती सुरू असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान मी सलुनमधील वॉशरुमचा वापर केला आणि सततच्या दौऱ्यामुळे थकवा जाणवत असल्याने तेथेच चेहऱ्यावर पाणी घेतले आणि त्याला म्हणालो की थोडं फ्रेश करुन दे. येवढ्यात कुणीतरी व्हिडिओ तयार केला आणि सोशल मिडियावर व्हायरल केला. कुण्यातरी विरोधकाचे हे काम दिसते आहे. 

आम्ही राहतो त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्याने तो परिसर कंटेन्मेंट झोन झाला. त्यामुळे मला तेथे जाता न आल्याने वॉशरूम वापरायला सलुनमध्ये गेलो होतो. व्डिडिओ व्हायरल करुन केवळ आणि केवळ मला बदनाम करण्याचे प्रयत्न कुणीतरी करीत आहे. याबाबत भंडारा नगर परिषदेने आधीच त्या सलून मालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. असे असताना लोकांना भ्रमित करण्यासाठी वीडियो वायरल केल्याचे खासदार मेंढे यांनी सांगितले. याबाबत कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करणार असल्याचे खासदार मेंढे म्हणाले.     (Edited By : Atul Mehere) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com