आम्ही मंचावर बसणार नाही.. मंत्री, खासदार, आमदारांनी पदाची झुल हटवली !

लहान मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांची भाषणं त्यांनी ऐकली. त्यांच्या सूचना आणि प्रश्न समजून घेतले. विशेष म्हणजे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ठिकठिकाणी मोर्चेक-यांचे स्वागत करणारे फलक लावले. मात्र त्यांनी शुभेच्छा फलकावर आपल्या पदाचा उल्लेख केला नाही.
OBC morcha chd
OBC morcha chd

चंद्रपूर : हजारोच्या संख्येच्या गर्दीचा मोह एरवी राजकारण्यांना आवरत नाही. मात्र चंद्रपुरातील ओबीसी मोर्चा याला अपवाद ठरला. राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी आपले पद आणि राजशिष्टाचार बाजुला ठेवला. सामान्य ओबीसी कार्यकर्ते म्हणून ते मोर्चात सहभागी झाले. एवढेच नव्हे तर मंचावर जाण्याचा मोह टाळला आणि श्रोत्यांमध्ये बसून सर्व वक्त्यांची भाषणं ऐकली. त्यांच्या कृतीचे कौतुक सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

विशाल मोर्चा
जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी ओबीसी जनगणना समन्वय समितीच्यावतीने आज चंद्रपुरात ओबीसींचा विशाल मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने ओबीसी पुरूष, महिला, विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात सर्व पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर आणि जिल्ह्यातील इतर ओबीसी आमदार मंचावर बसणार काय? याकडे मोर्चेक-यांचे लक्ष लागले होते. लोकप्रतिनिधी मंचावर चढले तर त्याला राजकीय स्वरूप प्राप्त होईल, अशी चर्चा होती. 

वडेट्टीवार, धानोरकर, धोटे यांनी स्वत:च आयोजकांना ‘आम्ही मंचावर बसणार नाही. सामान्य कार्यकर्ते म्हणून मोर्चात सहभागी होणार’, असे सुचविले. त्यानुसार हे सर्व नेते मोर्चात सहभागी झाले. सभास्थळी प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतील समोरच्या खुर्च्यांवर पालकमंत्री, खासदार आणि आमदार विराजमान झाले. त्यांची ही कृती मोर्चेक-यांनाही प्रचंड आवडली. ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधींनी पदाची आणि राजशिष्टाचाराची झुल बाजुला केली, याचीही चर्चा मोर्चेक-यांमध्ये होती. यावेळी समन्वय समितीच्यावतीने उपस्थित लोकप्रतिनिधींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

सर्व वक्त्यांची भाषणं होईपर्यंत उपस्थित सर्वच आमदार, खासदार आणि पालकमंत्री मोर्चास्थळी थांबून होते. लहान मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांची भाषणं त्यांनी ऐकली. त्यांच्या सूचना आणि प्रश्न समजून घेतले. विशेष म्हणजे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ठिकठिकाणी मोर्चेक-यांचे स्वागत करणारे फलक लावले. मात्र त्यांनी शुभेच्छा फलकावर आपल्या पदाचा उल्लेख केला नाही. आपल्या नावासमोर आमदार लिहीणे टाळले. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री असतानाही ओबीसींच्या मोर्चात ओबीसी बांधव म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. त्याचीही चर्चा होती.
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com