ओबीसींना न्याय आम्हीच मिळवून देऊ : आमदार सुधीर मुनगंटीवार

कायद्याच्‍या चौकटीत बसवून आता ओबीसींना न्‍याय देण्‍यात यावा. महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले असून भाजप ओबीसी समाजाच्‍या पाठीशी ठामपणे उभी आहे. ओबीसी समाजाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी भाजप कटिबद्ध असून या समाजाच्‍या मागण्‍या मान्‍य न झाल्‍यास आंदोलन अधिक तीव्र करण्‍यात येईल
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : आमचे सरकार असताना ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. ओबीसींबद्दल भाजपला नेहमीच आस्था राहिली आहे. नुकतेच सर्वोच्‍च न्‍यायालयाने ओबीसी समाजाकरिता असलेले राजकीय आरक्षण रद्द केले. ही अतिशय दुःखद बाब आहे. महाविकास आघाडी सरकारने कोर्टामध्‍ये ओबीसी समाजाची बाजू योग्‍य पद्धतीने न मांडल्‍यामुळे हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करीत ओबीसींना न्याय आम्हीच मिळवून देऊ, असे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

याआधी मराठा आरक्षण व आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्‍यामुळे महाविकास आघाडी सरकार संवेदनहीन असल्‍याचे दिसून आले आहे. ओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपचा लढा सुरूच राहणार आहे. भारतीय जनता पक्षातर्फे चंद्रपूरच्या जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आज आक्रोश आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना त्‍यांच्‍या तृतीय पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.

यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजप जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजप जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्‍य प्रा. प्रकाश बगमारे, ओबीसी मोर्चा जिल्‍हा संयोजक अविनाश पाल, महानगर ओबीसी मोर्चा अध्‍यक्ष विनोद शेरकी, उपमहापौर राहुल पावडे, भाजप महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, संजय गजपूरे, क्रिष्‍णा सहारे, जि.प. सभापती नागराज गेडाम, मूल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, भाजप महिला आघाडी अध्‍यक्ष अलका आत्राम, पं.स. सभापती रामलाल दोनाडकर, विवेक बोढे, रामपाल सिंग, प्रदीप किरमे, विठ्ठलराव डुकरे, राजेंद्र अडपेवार, वसंता देशमुख, दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्‍लीवार, शिला चव्‍हाण, माया उईके, कल्‍पना बगुलकर, नीळकंठ मानापूरे, ज्‍योती बुरांडे, नारायण हिवरकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.  

आमदार मुनगंटीवार म्‍हणाले, न्‍यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्‍या पाठपुराव्‍यानंतरही महाविकास आघाडी सरकारकडून राज्‍य मागासवर्ग आयोग स्‍थापन करण्‍यास चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्‍थापन करून सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे मुदत मागितली असती तर स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील आरक्षण रद्द करण्‍याची वेळच आली नसती. राज्‍य सरकारच्‍या या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्‍टात आले आहे. भाजप सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. परंतु ज्‍या गोष्‍टी याआधी हक्‍काने त्‍या त्‍या समाजाला मिळाल्‍या, त्‍या तशाच ठेवून व कायद्याच्‍या चौकटीत बसवून आता ओबीसींना न्‍याय देण्‍यात यावा. महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले असून भाजप ओबीसी समाजाच्‍या पाठीशी ठामपणे उभी आहे. ओबीसी समाजाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी भाजप कटिबद्ध असून या समाजाच्‍या मागण्‍या मान्‍य न झाल्‍यास आंदोलन अधिक तीव्र करण्‍यात येईल, असा इशारा त्‍यांनी दिला.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टिका केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्‍यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. सरकारवर विविध पद्धतीने दबाव आणून आम्‍ही हे आरक्षण परत मिळविण्‍याचे पूर्ण प्रयत्‍न करू. जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी महाविकास आघाडी सरकारचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजालाच नाहीतर कोणत्‍याही समाजाला न्‍याय मिळवून देऊ शकले नाही. एवढेच नाहीतर हे सरकार कोरोनाच्‍या संकटातही जनतेच्‍या पाठीशी नाही, हे स्‍पष्‍ट झाले आहे. अशा सरकारचा सर्वसामान्‍य जनतेनेही निषेध नोंदविला पाहिजे, असे ते म्‍हणाले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर यांच्‍या नेतृत्‍वात भाजपच्या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकाऱ्यांमार्फत मुख्‍यमंत्र्यांना निवेदन सादर केले. संचालन भाजप ग्रामीण ओबीसी आघाडी अध्‍यक्ष अविनाश पाल यांनी केले. महानगर ओबीसी मोर्चा अध्‍यक्ष विनोद शेरकी यांनी 
आभार मानले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com