आमच्या मध्ये शत्रुता नाही, तर वैचारिक मतभेद आहेत : सुधीर मुनगंटीवार

मोदींचा मुकाबला करायचा असेल तर जेथे सत्ता आहे तेथे विकास करून दाखवा, असे आव्हान देत मुनगंटीवार म्हणाले, भाजपचे आमदार फुटतील असे सांगणारे आता नगरसेवक फोडत आहेत.
Sudhir Mungantiwar - Uddhav Thackeray.
Sudhir Mungantiwar - Uddhav Thackeray.

नागपूर : आमदार प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांनी काल लेटर बॉंब Letter Bomb टाकल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि विविध प्रतिक्रिया उमटायला लागल्या. भाजप नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar म्हणाले, शिवसेना आणि आमच्यात शत्रुता नाही, तर वैचारिक मतभेद आहेत. we have no enmity but ideological differences said sudhir mungantiwar  उद्धव ठाकरे यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट करावी. 

मुनगंटीवार म्हणाले, प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर आम्हाला भाष्य करायचे नाही. पण सध्या जे काही चालले आहे, त्यावर शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल जे पत्र दिले, ते भविष्यात राजकारणात होणाऱ्या बदलांची नांदी आहे, असे कुणी म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. कारण आमच्यात शत्रुत्व नाहीच, आहेत ते केवळ वैचारिक मतभेद. आता शिवसेना नेत्यांनी योग्य भूमिका घेण्याची प्रतीक्षा आहे. 

शिवसेना असो की महाविकास आघाडी सरकारमधील इतर दोन पक्ष, कुणावरही कारवाई झाली की, केंद्राकडे बोट दाखविले जाते. केंद्रीय तपास यंत्रणेमध्ये सारे गुलाम आहेत, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितले जाते, ते चुकीचे आहे. तपास यंत्रणेतील अधिकारी आपले निर्धारित काम करीत आहेत. त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीनुसार, ते जनसेवा करत आहेत. राज्यातील काही नेते तपास यंत्रणेला गुन्हेगार ठरविण्याचे काम करीत आहेत. हे त्यांनी सोडावे आणि सकारात्मक विचार करावा, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले. 

पवारांनी कितीही बैठका घेतल्या तरी फरक पडणार नाही..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. एक दोन नव्हे, तर तब्बल ९ तास त्यांची चौकशी चालला होती. त्यानंतर त्यांनीही तपास यंत्रणेवर दोषारोपण करायला हवे होते, तपास यंत्रणेला गुन्हेगार ठरवायला पाहिजे होते. पण त्यांनी तसे केले नाही. यावरून तरी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी धडा घ्यावा. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना सध्या बैठकांचा धडाका लावला आहे. पण त्यांनी कितीही बैठका घेतल्या तरी त्याचा काहीएक फरक पडणार नाही. त्यांनी प्रयत्न करून बघावे, हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांना यात यश येणार नाही. 

मोदींचा मुकाबला करायचा असेल तर..
मोदींचा मुकाबला करायचा असेल तर जेथे सत्ता आहे तेथे विकास करून दाखवा, असे आव्हान देत मुनगंटीवार म्हणाले, भाजपचे आमदार फुटतील असे सांगणारे आता नगरसेवक फोडत आहेत. पण ही त्यांची केविलवाणी धडपड आहे. उद्या सल्लागार समितीची बैठक आहे आणि आम्ही चार आठवड्यांचे अधिवेशन घेतले पाहिजे, ही भूमिका घेणार आहोत. या भूमिकेवर आग्रही राहून सरकारला चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्यास भाग पाडणार आहोत. नवी मुंबई विमानतळाच्या नावावर संघर्ष उभा राहू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com