वाझे, शर्मांचे खरे गुरु परमबिरसिंग असल्याची पोलिस दलात चर्चा... - waze and sharmas rear master is parambirsing the discussion in police force | Politics Marathi News - Sarkarnama

वाझे, शर्मांचे खरे गुरु परमबिरसिंग असल्याची पोलिस दलात चर्चा...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 22 जून 2021

अंटेलीया प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्याचा मोठा सहभाग असून भाजप त्यांना वाचवीत आहेत, असाही आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. 

मुंबई : सचिन वाझे Sachin Waze याचे निलंबन रद्द करून त्याला खात्यात तर घेतलेच शिवाय त्याला एकाच दिवसात सीआययू सारख्या महत्वाच्या शाखेचे प्रमुख केले. हा सर्व प्रकार परमबिरसिंग Parambirsing यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त Mumbai's Police Commissioner असताना केला. हे सध्याच्या पोलिस आयुक्तांनी गृहविभागाला दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. अशाच प्रकारे प्रदीप शर्मा Pradeep Sharma यांना खात्यात घेऊन ठाणे पोलिस आयुक्त असताना परमबिरसिंग यांनी २४ ऑगस्ट २०१७ ला त्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख केले. त्यामुळे वाझे व शर्मा यांचे खरे गुरु हे परमबिर सिंगच आहे, अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.  

वाझे नंतर शर्मा यांना एनआयएने अटक केल्यामुळे परमबिरसिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंटेलीया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यत अनेक आजीमाजी पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सचिन वाझे, विनायक शिंदे, रियाज काझी, प्रकाश ओव्हळ, सुनील माने आणि आता प्रदीप शर्मा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. परवा परवा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर परमबिरसिंग हेच या संपूर्ण प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा आरोप केला. स्वतःचा बचाव करणाऱ्यासाठी भाजपला हाताशी धरून त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप केले. अंटेलीया प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्याचा मोठा सहभाग असून भाजप त्यांना वाचवीत आहेत, असाही आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. 

प्रदीप शर्मा यांना अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एनआयएकडे प्रदीप शर्मा यांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे एनआयएच्या वकिलांनी कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात सांगितले आहे. प्रदीप शर्मा व सचिन वाझे हे परमबिरसिंग यांच्या जवळचे होते. ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना प्रदीप शर्मा याला तर मुंबईचे पोलिस आयुक्त असताना सचिन वाझे याला महत्वाच्या जबाबदाऱ्या परमबिरसिंग यांनीच दिल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून ते वसुलीचे काम करीत होते. यामुळे अंटेलीया व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबिर सिंग यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. एनआयएने त्यांना एकदा चौकशीसाठीसुध्दा बोलावे होते. एनआयए प्रत्येक गोष्टीचा खुलासा करते, परंतु परमबिरसिंग यांना कशाला चौकशीसाठी बोलाविले होते, ते मात्र अद्यापही त्यांनी स्पष्ट केले नाही. 

हेही वाचा : सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहिलं, राऊतांनी सांगितलं कारण

Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख