नाराज राष्ट्रवादीचे घड्याळ आता कॉंग्रेसच्या हातात, बैठकीत फुटली कोंडी..

शिवसेनेने जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. अद्याप त्यावर कुठलाही निर्णय कळविण्यात आला नसल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले.
ZP election nag
ZP election nag

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता नागपूर जिल्ह्यात १६ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. दरम्यान या निवडणुका ६ महिने पुढे ढकलाव्या, यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या निवडणुका होतील की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. But the congress and the NCP have decided to fight together. 

जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितच लढण्याचा निर्णय काल घेतला. याकरिता सार्वत्रिक निवडणुकीतील फॉर्म्युला कायम ठेवण्यात येणार असून दोन्ही काँग्रेस आपआपल्या जागा कायम ठेवणार आहेत. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची काल दुपारी शेतकरी संघाच्या सभागृहात बैठक झाली. यात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने रमेश बंग, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर उपस्थित होते. १६ जागांवर पोट निवडणूक होणार आहे. ओबीसींसाठी राखीव जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसच्या ७, राष्ट्रवादीचे ४, भाजपचे ४ आणि शेकापच्या १ सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडी कायम राहणार नाही, अशी चर्चा होती. जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा देताना काँग्रेसने दुय्यम स्थान दिल्याने राष्ट्रवादी नाराज होती. सर्व पक्ष स्वबळावर लढतील असे चित्र होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत ही कोंडी फुटली. सार्वत्रिक निवडणुकीत ज्यांच्याकडे जागा होत्या, त्या त्यांच्याच पक्षाकडे राहणार आहेत. 

शिवसेनेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे 
शिवसेनेने जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. अद्याप त्यावर कुठलाही निर्णय कळविण्यात आला नसल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या ‘महाविकास आघाडी’त स्थान राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविलेले ओबीसींचे आरक्षण पूर्ववत मिळविण्यासाठी ओबीसी संघटनांतर्फे लढा पुकारला गेला आहे, २६ आणि २७ जून रोजी लोणावळ्यात त्यासाठी चिंतन बैठक पार पडली. ओबीसी संघटनांनी दबाव वाढवून आरक्षण पूर्ववत मिळविले, तर या निवडणुकासुद्धा घेऊ नये, अशीही मागणी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
Edited By : Atul Mehere 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com