वंजारींचा विजय दृष्टीक्षेपात, हवी ३८००मते…

पहिल्या फेरीमध्ये अभिजित वंजारी यांना ५५९४७ मते मिळाली, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना ४१५४० मते मिळाली. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सध्या सुरू आहे.
Sandeep Joshi -Abhijeet Wanjari.
Sandeep Joshi -Abhijeet Wanjari.

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी काल सकाळी ८ वाजता सुरू झाली. पहिल्या फेरीची मोजणी पूर्ण झाली असून आज पहाटे दुसऱ्या फेरीची मोजणी सुरू झाली आहे. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मोजणीमध्येही कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय दृष्टीक्षेपात आला असून विजयासाठी आता केवळ ३८०० मतांची आवश्‍यकता आहे. 

पहिल्या फेरीमध्ये अभिजित वंजारी यांना ५५९४७ मते मिळाली, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना ४१५४० मते मिळाली. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सध्या सुरू आहे. यामध्ये वंजारी यांनी १००० मतांची आघाडी घेतली असून त्यांना मिळालेली एकूण मते ५६९४७ झाली आहेत. तर संदीप जोशी यांना आतापर्यंत ४१६५२ मते मिळाली आहेत. ६०७४७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी वंजारींना आता केवळ ३८०० मतांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे ते विजयाच्या अगदी समीप आले आहेत. 

मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर १ लक्ष ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७ चा कोटा कोणताही उमेदवार अद्याप पूर्ण करू शकला नाही. १०.३० ते ११ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या गोटात विजयोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com