वणीच्या आमदारांना माहिती नाहीत यवतमाळचे पालकमंत्री...  - wanis mla do not know yavatmals guardian minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

वणीच्या आमदारांना माहिती नाहीत यवतमाळचे पालकमंत्री... 

सुमित हेपत 
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

समाज माध्यमावर येथिल समारंभाचे फोटो प्रसारीत होताच विविध चर्चांना पेव फुटणे चालु झाले आहेत. माजी आमदार विश्वास नांदेकर विद्यमान खनिज प्रतिष्ठानचे सदस्य असतांना विजय पिदूरकर यांना फलकावर सदस्य खनिज प्रतिष्ठान असे नमुद केले आहे. या बाबीला राजकीय वळण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मारेगाव, (जि. यवतमाळ) : तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प येथुन करणवाडी या गावाकरिता खनिज विकास निधीतून नळयोजना राबविण्याकरिता ३१ मार्च रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार याच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. परंतु येथिल फलकावर आमदार मदन येरावर यांच्या नावासमोर पालकमंत्री असे नमुद केले आहे. या विषयी परिसरात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

३१ मार्च रोजी नवरगाव मध्यम प्रकल्प येथे  करणवाडी गावाकरीता नळयोजनेचा भूमिपूजन समारंभ पार पडला. फलकावर आमदार मदन येरावार यांच्या नावासमोर पालकमंत्री यवतमाळ जिल्हा असे नमुद केले गेले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आमदार मदन येरावार पालकमंत्री कसे, असा सवाल जनतेतून केला जात आहे. काहींनी तर बुद्धिपुरस्सर केला असल्याचा आरोप सुद्धा केला आहे. सत्ता समिकरण बदलाचे संकेत तर नाहीत, असेही बोलले जात आहे. समाज माध्यमावर येथिल समारंभाचे फोटो प्रसारीत होताच विविध चर्चांना पेव फुटणे चालु झाले आहेत. माजी आमदार विश्वास नांदेकर विद्यमान खनिज प्रतिष्ठानचे सदस्य असतांना विजय पिदूरकर यांना फलकावर सदस्य खनिज प्रतिष्ठान असे नमुद केले आहे. या बाबीला राजकीय वळण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नवरगाव मध्यम प्रकल्प येथे करणवाडी गावाकरीता नळ पाणी पुरवठा योजने करीता विहिरीच्या भूमीपूजन पार पडले. येथे लावण्यात आलेल्या फलकावरील काही बाबी चुकीने नमुद झाल्या आहेत. मंजुरात जुनीच होती परंतु गावाच्या राजकीय हेव्यामुळे काम झाले नव्हते. आता या कामाला सुरुवात झाली आहे.
-ज्ञानेश्वर चिकटे 
भाजपा मारेगाव तालुका अध्यक्ष.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख