प्रतीक्षा संपली; नागपुरात डॉ. दीपांकर भिवगडेंनी घेतली पहिली लस..

शहरात जवळपास २४ हजारांवर तर ग्रामीण भागात सुमारे अकरा हजारांवर शासकीय व खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांची कोविड पोर्टलवर नोंदही झाली आहे.
Covid dr dipankar.
Covid dr dipankar.

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लस बुधवारी रात्री नागपुरात दाखल झाली. त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण केव्हा सुरू होईल, याची प्रतीक्षा नागपूरकरांना होती. ती प्रतीक्षा आज संपली. महानगरपालिकेच्या पाचपावली येथील रुग्णालयात डॉ. दीपांकर भिवगडे यांना आज सकाळी कोविडची पहिली लस टोचण्यात आली. 

आज शहरातील पाचशे जणांना ही लस दिली जाणार आहे. मेयो, मेडिकल, डागा, एम्स रुग्णालय आणि महानगरपालिकेचे पाचपावली रुग्णालय अशा पाच ठिकाणी ही प्रतिबंधक लस आज देण्यात येणार आहे. या प्रत्येक रुग्णालयात १०० अशा ५०० जणांना आज लस दिली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाची लस नागपुरात दाखल झाली तेव्हापासून कोरोनाची भिती कमी झाल्याचे बघायला मिळत आहे.

शहरात जवळपास २४ हजारांवर तर ग्रामीण भागात सुमारे अकरा हजारांवर शासकीय व खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांची कोविड पोर्टलवर नोंदही झाली आहे. शहरी भागात लसीच्या साठवणुकीसाठी ४८ तर ग्रामीण भागामध्ये ६८ ‘कोल्ड चेन पॉईन्ट्स’ची व्यवस्था करण्यात आली आहे. आजपासून सुरू झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या लसीकरणानंतर नागरिकांसाठी ती उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. 

यापूर्वी जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाचा ‘ड्राय रन’ झाला होता. या लसीकरणासंदर्भातील आढावा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घेतला. तेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक थेटे आदी उपस्थित होते. 

ग्रामीण भागात कळमेश्वर, मौदा, भिवापूर, उमरेड, काटोल, नरखेड, पारशिवनी, हिंगणा, कुही, रामटेक व कामठी उप जिल्हा रुग्णालय, सावनेर येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण संस्था व नागपूर ग्रामीण तालुक्यातील बोरखेडी तसेच कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com