वडेट्टीवार म्हणाले, ‘तत्त्वतः’ म्हणायचे राहूनच गेले होते; मिडीयावर फोडले खापर... - wadettiwar said in principle was left to say blame on media | Politics Marathi News - Sarkarnama

वडेट्टीवार म्हणाले, ‘तत्त्वतः’ म्हणायचे राहूनच गेले होते; मिडीयावर फोडले खापर...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 जून 2021

विजय वडेट्टीवार यांनी आधी पत्रकार परिषदेत अनलॉकच्या बाबतीत घोषणा केल्यानंतर माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याला ठळकपणे प्रसिद्धी दिली. त्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यावर खुलासा आला. त्यानंतर वडेट्टीवारांची घोषणा फुसका बार ठरल्याच्याही बातम्या आल्या.

नागपूर : आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार Disaster Management Minister Vijay Vadettiwar यांनी पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्ह्यांची चार गटांत विभागणी केल्याचे सांगत कमी पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन हा तातडीने उद्यापासून (४ जून) रद्द केल्याची घोषणा केली होती. The lockdown was announced to be canceled immediately from tomorrow (June 4) अनलॉककडे सर्वांच्या नजरा असल्याने मिडियाने त्यांच्या वक्तव्याला ठळकपणे प्रसिद्धी दिली. मात्र नंतर तासांतच मुख्यमंत्री कार्यालयाने खुलासा केल्याने त्यांची फजिती झाली. He was humiliated by the revelation made by the Chief Minister's Office त्यानंतर नागपुरात पोहोचल्यावर अनलॉकच्या ‘त्या’ निर्णयाला ‘तत्वतः’ मान्यता दिली असल्याचे माध्यमांना सांगत घुमजाव केले. पूर्वी ‘तत्वतः’ हा शब्द बोलण्याचे राहून गेले होते, अशी कबुलीही त्यांनी दिली. 

वडेट्टीवार म्हणाले, राज्यभरात ग्रामीण आणि महानगर असे मिळून ४३ युनिट तयार केले आहेत. त्यातील १८ युनिट अनलॉक करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार यास एचडीएमनं मान्यता दिली आहे हे मात्र लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. शिथिलता आणणं हे नक्की आहे. मात्र टप्प्याटप्याने ही शिथिलता देण्यात येईल. आज मान्यता मिळाली आहे, ठरवण्यात आलेल्या ५ टप्प्यांच्या बाबतीत उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील…
आपत्ती व्यवस्थापन विभागाने महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याला मान्यता दिली आहे. लॉकडाऊन उठवला पाहिजे, हे सर्वांनाच वाटते. कारण त्यावर उद्योगधंदे आणि अर्थचक्र निर्भर आहे. राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन जनतेने केल्यामुळे कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. दर ७ दिवसांना त्याचा अहवाल घेणे सुरू आहे. अनलॉकसाठी जे टप्पे पाडण्यात आलेले आहेत, त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घोषित करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

हेही वाचा : यासाठी जयंत पाटलांनी डॉ. अमोल कोल्हेंना बोलवून घेतले....

मिडियावर फोडले खापर…
विजय वडेट्टीवार यांनी आधी पत्रकार परिषदेत अनलॉकच्या बाबतीत घोषणा केल्यानंतर माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याला ठळकपणे प्रसिद्धी दिली. त्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यावर खुलासा आला. त्यानंतर वडेट्टीवारांची घोषणा फुसका बार ठरल्याच्याही बातम्या आल्या. त्यानंतर नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘पत्रकार परिषदेनंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून जणू काही उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रच अनलॉक होतोय, असे चित्र निर्माण करण्यात आलं. काही माध्यमांनी तसं ठळकपणे प्रसिद्ध केलं.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचे तत्त्वतः म्हणण्‍याचे राहून गेल्याचे खापर त्यांनी माध्यमांवर फोडल्याची चर्चा प्रतिनिधींमध्ये रंगली होती. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख