वडेट्टीवार भडकले ! म्हणाले, एका बापाची अवलाद असशील, तर पुरावे दे...

हा पत्रप्रपंच तर पडळकरने केला, त्याला माझे एक सांगणे आहे की, आरोप जर सिद्ध करून दाखवला नाही, तर मानहानीचा ५० कोटींचा दावा टाकेल आणि चंद्रपूर-गडचिरोलीच्या चकरा मारायला लावेल.
वडेट्टीवार भडकले ! म्हणाले, एका बापाची अवलाद असशील, तर पुरावे दे...
Gopichand Padalkar - Vijay Wadettiwar

नागपूर : भाजप नेते गोपीचंद पडळकर BJP Leader Gopichand Padalkar यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Minister Vijay wadettiwar यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसे पत्रच त्यांनी वडेट्टीवारांच्या नावे लिहीले आहे. त्यानंतर विजय वडेट्टीवार चांगलेच भडकले. एका बापाची अवलाद असशील, तर केलेल्या आरोपांचा एक तरी पुरावा आणून दे, If there is a descendant of a father then give proof आणि माझी माफी माग, अन्यथा शिक्षा भोगायला तयार हो, अशा तिखट शब्दांत वडेट्टीवारांनी पडळकरांच्या पत्राला उत्तर दिले आहे. 

वडेट्टीवार म्हणाले, पडळकर... तू एका बापाची अवलाद असतील, तर एक तरी आरोप सिद्ध करून दाखव. फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बेताल बोलत जाऊ नकोस. तुझ्यासारखे पातळी सोडून आम्ही बोलत नाही. कारण राजकारणात प्रत्येकाचा मान सन्मान ठेवावा लागतो. छत्तीसगडमध्ये दारूची फॅक्टरी आहे, हे जर तू सिद्ध केले, तर ती फॅक्टरी तुझ्या नावाने करून देतो, तुझ्या खानदानीच्या नावाने करून देतो. माझ्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या नावे, असे काहीही असेल तर ते सिद्ध करून दाखव, नाही तर शिक्षा भोगायला तयार हो, कारण तुझ्या विरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा मी ठोकणार आहो,   

ज्याने येवढ्यात काही पत्रव्यवहार केला आहे, ‘त्या’ बालकाला मला सांगायचं आहे, की मी ५ वेळा विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे त्याने जो काही पत्रप्रपंच केला आहे. त्यात माझे शिक्षण काढण्यात आले आहे. त्याला मला सांगायचे आहे की ज्या पक्षात तू आहे, त्या पक्षाचे शिक्षणमंत्री किती शिकले आहेत? कोकणातून आलेले नेते, जे आत्ताच केंद्रात मंत्री झाले, ते किती शिकले आहेत. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री किती शिकले आहेत, याची माहिती आधी घे, असा सल्ला वडेट्टीवार यांनी पडळकरांना दिला. 

तिसरा वर्ग शिकलेला चालतो काय?

तुच्याकडे ३ रा वर्ग शिकलेला पाणी पुरवठा मंत्री झाला. बबनराव लोणीकर त्यांचे नाव आहे. आमच्या जिल्ह्यातील तुमचा एक नेता जो केंद्रीय राज्यमंत्री होता, तोसुद्धा १०वीच शिकलेला आहे. काय बोलतो, कुणाच्या बाबत बोलतो, कसा बोलतो…, असे प्रश्‍न करीत तु आत्ता आत्ताच जेमतेम राजकारणात आलेला आहे. आणि मला म्हणतो की तुमची २३ दारूची दुकाने भागिदारीत आहेत. अरे नालायका भागीदारीत दारूचे एकही दुकान माझ्या नावे निघाले, तर राजकारणातून बाहेर जाललो जाईल, असे आव्हान वडेट्टीवार यांनी पडळकर यांना दिले. 

पत्रातील १ आरोप तरी सिद्ध करून दाखवावा..
हा पत्रप्रपंच तर पडळकरने केला, त्याला माझे एक सांगणे आहे की, आरोप जर सिद्ध करून दाखवला नाही, तर मानहानीचा ५० कोटींचा दावा टाकेल आणि चंद्रपूर-गडचिरोलीच्या चकरा मारायला लावेल. गोसेखुर्द प्रकल्पामध्ये ठेकेदाराला टक्केवारी मागितली, दारूची फॅक्टरी विकत घेतली, डिलरशिप घेतली, असे अत्यंत हिन आरोप पडळकरांनी केले आहेत. टक्केवारी तर सोडाच एक रुपयासुद्धा कुणाकडून मी घेतलेला नाही, तर एका चहाचासुद्धा डागीनदार मी कुणाचा नाही, हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कुणीही सांगेल, असे वडेट्टीवार म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in