उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांत उडाली शाब्दिक चकमक, मुख्यमंत्र्यांनी केला हस्तक्षेप ?

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेशाची समीक्षा करावी.
Ajit Pawar - Nitin Raut
Ajit Pawar - Nitin Raut

नागपूर : राज्य सरकारने पदोन्नतीबाबत काढलेल्या आदेशावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असताना (While the discussion is going on in the cabinet meeting) उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut) यांच्यात चांगलीच चकमक उडाल्याची माहिती आहे. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी हस्तक्षेप केला आणि या विषयावर उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या,  (Suggestions for settlement) अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पदोन्नतीबाबत काढण्यात आलेल्या आदेशाचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. ऊर्जामंत्री नितीन राऊतसह काही मंत्र्यांनी याला विरोध दर्शवीत उपसमितीला विश्वासात न घेतल्याने नाराजी व्यक्त केली. फडणवीस सरकारच्या काळात मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्यांवर स्थगिती देण्यात आली होता. त्यामुळे जवळपास तीन, साडेतीन वर्षापासून त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. परंतु पदोन्नतीत आरक्षण देण्याचे टाळले. 

आदेशातील काही अटींवर मागासवर्ग संघटनांनी आक्षेप घेतला. त्यामुळे तीनदा आदेश बदलावा लागला. सरकारने ७ मे रोजी काढलेल्या आदेशात ३३ टक्के जागा राखीव न ठेवता सरसकट सर्व १०० टक्के जागा सेवाज्येष्ठतेच्या आधारे भरण्याचे सांगितले. याचाही विरोध करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासाठी उपसमिती गठित करण्यात आली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर बैठक घेत सर्व जागा सेवाज्येष्ठतेच्या आधारे भरण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येते. 

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेशाची समीक्षा करावी तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारी बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीतील निर्णय मुख्यमंत्र्याकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com