लसीकरण : महापौरांवर स्वपक्षीयच नाराज, तर राष्ट्रवादीचे नेते पवार आयुक्तांना करणार घेराव..

प्रशांत पवार यांनी आयुक्त निष्क्रिय असल्याच्या आरोप करीत त्यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी केली. सोशल मीडियावरही अनेकांनी आयुक्तांवर निष्क्रियतेचा आरोप केला असून त्यामुळेच शहरात कोरोना वाढत असल्याचे मतही नोंदविले आहे.
Balya Borkar - Dayashankar Tiwari - Prashant Pawar
Balya Borkar - Dayashankar Tiwari - Prashant Pawar

नागपूर : कोरोनाचा विषाणू (Corona virus) वेगाने पसरत आहे. बाधितांची आणि मरणाऱ्यांची संख्या दररोज वाढते आहे. काही स्वयंसेवी संस्था (NGO) आपआपल्या परीने या काळात कार्य करताना दिसत आहे. लस आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या (Vaccines and remedial injections) तुटवड्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकही भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत काही नेते मात्र अद्यापही राजकारणात गुरफटून (In politics) असल्याचे दिसत आहे. एका लसीकरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमावरून (inaugural event) महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे.  

शहरात लसीकरणाचा बोजवारा उडाला असतानाच त्यावर राजकारणही तापत असल्याचे चित्र आहे. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाला न बोलावल्यामुळे महापौरांवर त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकाने नाराजी व्यक्त केली. इतर लसीकरण केंद्रांवर लसीसाठी मारामार असताना महाल रोगनिदान केंद्रालाच मुबलक लस साठा कसा उपलब्ध होतो, असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी आयुक्तांना घेराव करण्याचा इशारा दिला.
 

कोरोनाने शहरात दररोज शंभरावर बळी जात असून सत्ताधाऱ्यांकडून मात्र लसीकरण केंद्राचे उद्घाटन सोहळे पार पाडले जात आहे. एवढेच नव्हे फोटोसेशनही जोरावर असल्याने सामान्य नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करीत आहेत. त्यातच आता कोरोनाच्या गंभीर काळातही लसीकरण केंद्र सुरू केल्याची माहिती न दिल्याने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. छापरूनगर परिसरात छापरूनगर सर्वोदय जनता हॉलमध्ये काल, गुरुवारपासून महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. परंतु या केंद्राला सुरुवात करीत असल्याची माहिती प्रभागाचे नगरसेवक बाल्या बोरकर, झोन सभापती मनीषा अतकरे, आमदार कृष्णा खोपडे यांना देण्यात आली नाही. 

विशेष म्हणजे बाबूलबन परिसरातील मनपाच्या आयुर्वेदिक दवाखान्यातील लसीकरण केंद्रातील ७० टक्के कर्मचारी या नव्या लसीकरण केंद्राला उपलब्ध करून देण्यात आले. यावर नगरसेवक बाल्या बोरकर यांनी नाराजी व्यक्त केली. महापौर तिवारी यांनी त्यांना कार्यक्रमात बोलावण्याचा प्रयत्न केला, परंतु नगरसेवक बोरकर यांनी जाण्याचे टाळले. या परिसरातील तरुणांनीही महापौरांना विरोध केल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनीही महाल येथील एकाच लसीकरण केंद्रासाठी मुबलक लस उपलब्ध होत असल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

आयुक्तांनी लसीचा भ्रष्ट कारभार थांबवून मनपाच्या इतर लसीकरण केंद्रालाही मुबलक लस उपलब्ध करून द्यावी, अन्यथा घेराव करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. महापालिका निवडणुकीत राजकीय लाभासाठी लस दडपून आमदार प्रवीण दटके यांचे वर्चस्व असलेल्या केंद्राला लस देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

आयुक्त निष्क्रिय
प्रशांत पवार यांनी आयुक्त निष्क्रिय असल्याच्या आरोप करीत त्यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी केली. सोशल मीडियावरही अनेकांनी आयुक्तांवर निष्क्रियतेचा आरोप केला असून त्यामुळेच शहरात कोरोना वाढत असल्याचे मतही नोंदविले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com