पदाधिकाऱ्यांना कमी लेखता... अजिबात खपवून घेतले जाणार नाही : महापाैरांचा मुंढेंना इशारा

तुकाराम मुंढे रोज नवनवे आदेश काढतात. रात्री दुकाने उघडायला सांगतात, तर सकाळी बंद करायला लावतात. आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्राबाहेर कुठले दुकाने उघडे ठेवायचे, कुठले बंद राहतील, याचा सविस्तर आदेश काढला होता. त्यांना दिवसही ठरवून दिले होते.
Tukaram Mundhe and Sandip Joshi
Tukaram Mundhe and Sandip Joshi

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे रोज नवनवे तसेच परस्परविरोधी आदेश काढीत असल्याने संभ्रमाची स्थिती झाली आहे. आदेश काढल्यानंतर त्याची माहिती पदाधिकाऱ्यांना देण्याचेही सौजन्य दाखविल्या जात नसल्याने महापौर संदीप जोशी यांनी कोविडसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत याचा चांगलाच समाचार घेतला. यापुढे पदाधिकाऱ्यांना कमी लेखण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असाही इशारा त्यांनी आयुक्त मुंढे यांना दिल्याचे समजते. 

तुकाराम मुंढे रोज नवनवे आदेश काढतात. रात्री दुकाने उघडायला सांगतात, तर सकाळी बंद करायला लावतात. आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्राबाहेर कुठले दुकाने उघडे ठेवायचे, कुठले बंद राहतील, याचा सविस्तर आदेश काढला होता. त्यांना दिवसही ठरवून दिले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी दुकाने उघडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्राबाबतही असेच प्रकार सुरू आहेत. जिथे कोरोनाचा लॉकडाउनचा कालावधी संपला असताना ते कायम ठेवले. आता 14 दिवसांचा नियम नाही, असे ते सांगत आहे. 

भाजीबाजाराबाबत रोज नव्या जागा घोषित केल्या जात आहे. बाजार उघडेपर्यंत त्याची माहिती दुकानदारांनाही नसते आणि नागरिकांनाही. त्यामुळे नागरिक पदाधिकारी, नगरसेवकांना फोन करतात. मुंढे यांनी काय आदेश काढले, याची माहिती लोकप्रतिनिधींनासुद्धा नसते. पदाधिकाऱ्यांना कोरोनासंदर्भात माहिती देऊ नका, असे तोंडी आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे महापौरांनी प्रशासनाला चांगलेच खडसावले. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही, अशा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com